मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mulgi Zali Ho : ‘मुलगी झाली हो’ मालिकेत पाच वर्षांचा लिप; येणार 'हे' मोठं वळण

Mulgi Zali Ho : ‘मुलगी झाली हो’ मालिकेत पाच वर्षांचा लिप; येणार 'हे' मोठं वळण

'मुलगी झाली हो' मालिका एक नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत आगामी भागात पाच वर्षांचा मोठा लिप पहायला मिळणार आहे.

'मुलगी झाली हो' मालिका एक नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत आगामी भागात पाच वर्षांचा मोठा लिप पहायला मिळणार आहे.

'मुलगी झाली हो' मालिका एक नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत आगामी भागात पाच वर्षांचा मोठा लिप पहायला मिळणार आहे.

  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 21 ऑगस्ट: सध्या मराठी मालिका मोठ्या प्रमाणावर चर्चेत असतात. बाकी सर्व मालिकांप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मालिकादेखील नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. या मालिकेत येणाऱ्या आगामी वळणामुळे सध्या मालिका चर्चेचा विषय ठरतेय. नुकतंच मुलगी झाली हो या मालिकेविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे.

'मुलगी झाली हो' मालिका एक नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत आगामी भागात पाच वर्षांचा मोठा लिप पहायला मिळणार आहे. या पाच वर्षांत साजिरीची मुलगी गोजिरी मोठी झालेली दाखवण्यात येणार आहे. याचा एक व्हिडीओही समोर आलाय. यामध्ये गोजिरी देवाजी पुजा करताना दिसतेय. 'वर्षांनंतर', असं व्हिडीओवर लिहिलेलं दिसतंय. या पोस्टवर अनेक कमेंटही येतायेत.

View this post on Instagram

A post shared by (@marathiserials_official)

'हे तर रंग माझा वेगळा मालिकेसारखं वाटतंय', असंही एका युजरनं म्हटलं आहे. मागच्या वेळीही या मालिकांमध्ये दाखवलेल्या सारख्या सीनमुळे ही मालिका ट्रोल झाली होती. गेल्या काही महिन्यांत या मालिकेनं प्रेक्षकांची निराशा केली आहे. सध्या मालिकेत वेगळाच ट्रॅक सुरु आहे. आता पुढे मालिकेत आणखी काय पहायला मिळणार, काय नवीन ट्वीस्ट आणि टर्न दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -  'वाटलं आपण राजकारणात जावं'; असं का म्हणाली बिग बॉस फेम सोनाली पाटील?

दरम्यान, किरण मानेंच्या राजकीय भूमिकेची चर्चा असतानाच 'मुलगी झाली हो' मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसकडून त्यांच्यावर वेगळेच आरोप करण्यात आले होते. सेटवरील गैरवर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचं प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आलं. त्यावेळी ही मालिका चांगलीच प्रकाश झोतात आली होती.

First published:

Tags: Marathi entertainment, Social media, TV serials