मुंबई, 08 डिसेंबर: कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे प्रदर्शन पुढे ढकललं गेलेल्या बर्याच चित्रपटांचं प्रदर्शन पुढे गेलं आहे. त्यापैकी अनेक चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रदर्शित होणार आहे. घरी बसल्या बसल्या तुम्हाला काही जबरदस्त अॅक्शन सिनेमे बघणार असाल तर आम्ही तुम्हाला काही भन्नाट पर्याय सांगणार आहोत. 'मुलान' या चित्रपटाने डिस्नी हॉटस्टार स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला आहे. 'द बल्लाड ऑफ मुलान' या चिनी लोककथेवर आधारित 1998 मध्ये एक अॅनिमेटेड चित्रपट आला होता. त्याचंच लाइव्ह - अॅक्शन रूपांतर तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहे. ही एका निर्भय तरूणीची कहाणी आहे जी आजारी वडिलांना वाचवण्यासाठी स्वतः पुरूषी वेष धारण करते आणि इम्पीरियल सैन्यात सेवा बजावते. आपणास लाईव्ह-अॅक्शन चित्रपट पाहणं आवडत असल्यास, तुम्ही हे 5 बिंज-वर्दी टाईटल्स स्ट्रिम करू शकता.
पोकेमॉन: डिटेक्टिव्ह पिकाचू
पूर्वार्ध : तुम्ही पोकेमॉन पहात लहानाचे मोठे झाले आहेत त्यांना हे पटेल की त्या मालिकेत पिकाचूसारखं मोहक दुसरं काहीच नव्हतं. पोकेमॉन विश्वातील पोकेमॉन युनिव्हर्स, पोकेमॉन : डिटेक्टिव्ह पिकाचू या पहिल्या लाइव्ह-अॅक्शन फिल्ममध्ये इलेक्ट्रोक्टींग पोकेमॉनला पाहू शकता. या चित्रपटात जस्टीस स्मिथ, कॅथ्रीन न्यूटन, सुकी वॉटरहाऊस आणि ओमर चापरो हे कलाकार आहेत, तर रायन रेनॉल्ड्सने प्रसिद्ध पोकेमॉनला आवाज दिला आहे.
कुठे पहाल – अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
मॅलेफिसेंट
स्लिपिंग ब्युटीची कथा आपणा सगळ्यांना माहीत आहे, पण मॅलेफिसेंट चित्रपट ही कथा वेगळ्या दृष्टिकोनातून सांगतो. हे मॅलेफिसेंटच्या भूतकाळातील गोष्टी आणि तिनी तसं का केलं हे यात पहायला मिळतं. अँजेलिना जोली यात प्रमुख भूमिकेत दिसली आहे, या चित्रपटामध्ये एले फॅनिंगने राजकुमारी ऑरोरा आणि मिशेल पफेफीफरनी क्वीन इंग्रिथची भूमिका साकारली आहे. मॅलेफिसेंटचा एक सिक्वेलदेखील आहे, ज्याचे मॅलेफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ इव्हिल असं नाव आहे.
कुठे पहाल – डिस्नी हॉटस्टार
ब्युटी अँड द बिस्ट
पूर्वार्ध : डिस्नी क्लासिक ब्युटी अँड द बिस्ट हा सिनेमा पाहून तुम्ही काही भन्नाट क्षण अनुभवणार आहात. एमा वॉटसन आणि डॅन स्टीव्हन्स यांचा अभिनय असलेला हा चित्रपट आपल्याला बॅलेच्या लोकप्रिय कथेत घेऊन जातो. बॅले, जिच्या वडिलांचं एका प्रिन्स/बिस्टने अपहरण केलं आहे. या लाइव्ह-अॅक्शन चित्रपटात आणखी मजा आणण्यासाठी अरियाना ग्रान्डे आणि जॉन लिजेंड यांच्या आवाजातील एक गाणं चित्रपटात घेतलं आहे.
कुठे पहाल – डिस्नी हॉटस्टार
मोगली
पूर्वार्ध : रुडयार्ड किपलिंगच्या मोगलीला पुन्हा चित्रपटात जिवंत करण्यासाठी ख्रिश्चन बेल, केट ब्लँशेट, बेनेडिक्ट कंबरबॅच, अॅन्डी सर्कीस आणि फ्रीडा पिंटो या सर्वांना एकत्र आणलं गेलं. ही कथा जंगलाच्या निसर्गसौंदर्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलाची आहे. सीजीआयसह डार्क थीमसह, मोगलीचा चित्रपट अगदीच फ्रेश आणि चमकदार दिसतो.
कुठे पहाल – नेटफ्लिक्स
डंबो
पूर्वार्ध : दिग्दर्शक टिम बर्टनचा डंबो त्याच नावाच्या डिस्नीच्या 1941 मधील अॅनिमेटेड क्लासिकवरून प्रेरित आहे. टिपिकल डिस्नीच्या सर्व ट्रॅपिंग्जसह, ही फँटसी अॅडव्हेंचर फिल्म हवेत उडण्यासाठी त्याच्या मोठ्या कानांचा उपयोग करणाऱ्या एका हत्तीच्या पिल्लाची कहाणी आहे मोठ-मोठे डोळे आणि फडफड फॅन-सारखे कान असलेल्या हत्तीच्या पिलाला उडता येणं तसं कठीण आहे.
कुठे पहाल – डिस्नी हॉटस्टार