'या' 5 कारणांसाठी मिस करू नका 'पीएम नरेंद्र मोदी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेचा फायदा या सिनेमाला होईल असं म्हटलं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 01:49 PM IST

'या' 5 कारणांसाठी मिस करू नका 'पीएम नरेंद्र मोदी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेला या सिनेमाची प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून प्रतिक्षा आहे. यामागे 5 मोठी कारणं आहेत ज्यामुळे लोक हा सिनेमा रिलीज होण्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पहिलं कारण असं की, सिनेमाचा ट्रेलर मोदींच्या आयुष्याशी जोडलेल्या काही घटनांची माहिती देण्याचं आश्वासन देतो. यात मोदींचं बालपण, शालेय जीवन, संन्यासाच्या वाटेवर असलेले नरेंद्र मोदी, त्यानंतर त्यांचं RSS मध्ये सहभागी होणं आणि मग राजकारणात प्रवेश या सर्व गोष्टी या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेला या सिनेमाची प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून प्रतिक्षा आहे. यामागे 5 मोठी कारणं आहेत ज्यामुळे लोक हा सिनेमा रिलीज होण्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पहिलं कारण असं की सिनेमाचा ट्रेलर मोदींच्या आयुष्याशी जोडलेल्या काही घटनांची माहिती देण्याचं आश्वासन देतो. यात मोदींचं बालपण, शालेय जीवन, संन्यासाच्या वाटेवर असलेले नरेंद्र मोदी, त्यानंतर त्यांचं RSS मध्ये सहभागी होणं आणि मग राजकारणात प्रवेश या सर्व गोष्टी या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

हा सिनेमा पाहण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण विवेक ओबेरॉय आहे.जवळपास 16 वर्षांच्या सिनेकारकिर्दित विवेकनं पहिल्यांदा बायोपिकमध्ये काम केलं आहे. या बायोपिकमधील त्याचा लूक सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यामुळे या भूमिकेला तो कितपत न्याय देऊ शकला आहे हे सिनेमा पाहिल्यावरच लक्षात येईल.

'सरबजीत' आणि मेरी कोम यांसारखे यशस्वी सिनेमे देणारे दिग्दर्शक ओमंग कुमार हे सुद्धा हा सिनेमा पाहण्यामागचं महत्वाचं कारणं ठरु शकतं. मेरी कोम सारख्या बायोपिकचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या ओमंग यांनी मोदींचा जीवनपट मोठ्या पडद्यावर कसा मांडलाय हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Loading...

जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' बराच काळ चर्चेत राहीला. त्यानंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होत असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकलाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. कारण या बायोपिकबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेचा फायदा या सिनेमाला होईल असं म्हटलं जात आहे. तसेच मोदींच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 11:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...