#FitnessFunda : असं केलं आर्चीनं वजन कमी, जाणून घ्या तिचं सिक्रेट

आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू बारावीच्या परीक्षेला बसतेय. सैराटमधली आर्ची आता बदललीय. तिनं आपल्या फिटनेसची कशी काळजी घेतलीय, ते वाचा

News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2019 06:22 AM IST

#FitnessFunda : असं केलं आर्चीनं वजन कमी, जाणून घ्या तिचं सिक्रेट

सैराटनंतर आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि अजूनही ती करतेय. ती आजही रिंकूपेक्षा आर्ची म्हणूनच ओळखली जातेय. तिचा कागर सिनेमा फेब्रुवारीत रिलीज होणार म्हणून सगळे खूश होते.

पण प्रेक्षकांना अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. कारण रिंकू बारावीच्या परीक्षेला बसतेय. त्यामुळे कागर पुढे ढकललाय.

बारावीची परीक्षा देणारी आर्ची फिटनेसची एकदम काळजी घेतेय. ती म्हणाली, 'सैराट संपला आणि काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की मी कमालीची जाडी झालीय. तेव्हा मी दहावीची परीक्षा देत होते.'

Loading...

ती पुढे सांगते, ' इतकं जाडं असणं आरोग्यासाठी चांगलं नाहीच मुळी. म्हणून मी ठरवलं आता आपलं वजन कमी करायचं.'

वजन कमी करायचा पण आर्चीनं निश्चयच केला होता. त्यासाठी तिनं काय केलं? रिंकू सांगते, ' मी पहाटे चार वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम म्हणजे चालायचे. त्यानंतर वाॅर्मअप आणि मग व्यायाम.'

तिनं आपल्या डाएटकडेही विशेष लक्ष दिलं होतं. ती म्हणाली, 'मी सकाळ आणि संध्याकाळ फक्त सॅलड खात होते. मला गोड जास्त आवडतं,पण तेही मी सोडलं. घरात गुलाबजाम वगैरे गोड पदार्थ बनत असतील तर मी तिथे फिरकायचीही नाही.' इतकंच काय रिंकूसमोर कुणी गोड पदार्थ खात असेल तर ती तिथून उठून निघून जायची.

यासाठी तिनं कुणी ट्रेनर नव्हता ठेवला. ती सांगते, तिची आईच तिची ट्रेनर आणि डाएटिशियन, या सगळ्याचा फायदा असा झाला की, २ ते ३ महिन्यात तिचं १२ किलो वजन कमी झालं.

आर्ची आता बारावीची परीक्षा देतेय. शारीरिक फिटनेसमुळे तिला अभ्यास करायचीही उर्जा मिळालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2019 06:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...