संजय दत्तच्या 'भूमी' सिनेमाचं पोस्टर रिलीज

संजय दत्तच्या 'भूमी' सिनेमाचं पोस्टर रिलीज

संजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यानंतरचा हा पाहिलाच सिनेमा

  • Share this:

22 एप्रिल : अभिनेता संजय दत्तच्या 'भूमी' सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. हा सिनेमा २२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल. सिनेमाची पूर्ण टीम लवकरात लवकर शूटिंग पूर्ण करणार असून पोस्ट प्रोडक्शनच्या तयारी लागणार आहे.

संजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यानंतरचा हा पाहिलाच सिनेमा असून या सिनेमात अदिती राव ह्याद्री आणि शेखर सुमन सुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. आग्रा आणि चंबळमध्ये संजय दत्तने जवळपास एक महिना राहून सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. संजूबाबा या सिनेमात अदितीच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसेल.

ओमांग कुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून संदीप सिंह आणि भूषण कुमार यांनी सिनेमाची निर्मिती केलीये. याआधीही ओमांग कुमार यांनी मेरीकॉम सारखा सिनेमा केला असून प्रियंका चोपडाने मेरीकॉमची भूमिका साकारली होती.

आग्रामध्ये सिनेमाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच गर्दीसुद्धा केली होती. त्यामुळे ट्रॅफिक जामच्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या होत्या. आग्रा आणि तेथील आजुबाजूच्या परिसरात सिनेमाचं बरचसं शूटिंग करण्यात आलंय.

चंबळमध्ये शुटिंगदरम्यान संजुबाबा फ्रॅक्चर सुद्धा झाला होता. मात्र नंतर पेनकिलर घेऊन त्यानं सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. 22 सप्टेंबरला सिनेमा रिलीज झाल्यानंतर संजूबाबाला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 08:32 PM IST

ताज्या बातम्या