'पद्मावती'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

'पद्मावती'चं पहिलं  पोस्टर प्रदर्शित

रणवीर सिंगने आपल्या सोशल मीडिया हॅँडलवर आणि इंस्ट्राग्रामवर सिनेमाचे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत. या पोस्टरमध्ये रणवीरची गर्लफ्रेंड दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या रूपात दिसते आहे.

  • Share this:

21 सप्टेंबर: संजय लीला भन्साळीच्या 'पद्मावती' या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. रणवीर सिंगने आपल्या सोशल मीडिया हॅँडलवर आणि इंस्ट्राग्रामवर सिनेमाचे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत. या पोस्टरमध्ये रणवीरची गर्लफ्रेंड  दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या रूपात दिसते आहे.

या पोस्टरमध्ये दीपिका राजपुत आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसते आहे. रणवीरने दिपीकाच्या या लुकची खूप तारीफ केली आहे. मल्लिका-ए-चित्तोड, पद्मावती' अशा शब्दात त्याने तिची तारीफ केली आहे. आतापर्यंत या सिनेमाच्या रिलीज डेटच्या तारखेबाबत खूप अफवा पसरल्या होत्या. पण पोस्टर पाहून हे स्पष्ट झालं आहे की आता पद्मावती 1 डिसेंबरला यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमामध्ये रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारतोय. तर या सिनेमामध्ये शाहीद कपूर राजा रतन सिंगच्या भूमिकेत दिसतोय. तर या सिनेमात अदिती राव हैदरी कमला देवीची भूमिका साकारते आहे. बाजीराव मस्तानीमधून लोकांची मनं जिंकल्यानंतर आता रणवीर-दीपिका संजय लीला भन्साळींच्या दुसऱ्या रॉमेन्टिक सिनेमामध्ये काम करत आहेत. या सिनेमासाठी रणवीर आणि शाहीद कपूर तलवारबाजीसुद्धा शिकले आहेत.

हा सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होतो आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतो की आपटतो हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 01:20 PM IST

ताज्या बातम्या