राणा दग्गुबतीचं चाहत्यांना गोड सरप्राइज, लॉकडाऊनमध्ये उरकला साखरपुडा; पाहा PHOTOS

लॉकडाऊनमध्येच बाहुबली फेम अभिनेता राणा दग्गुबती आणि त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाज यांचा साखरपुडा पार पडला.

लॉकडाऊनमध्येच बाहुबली फेम अभिनेता राणा दग्गुबती आणि त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाज यांचा साखरपुडा पार पडला.

 • Share this:
  मुंबई, 21 मे : बॉलिवूड अभिनेता राणा दग्गुबतीनं काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज या दोघांनी एका खासगी सोहळ्यात सारखपुडा उरकला. राणा आणि मिहिकाच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बाहुबली फेम राणा दग्गुबतीनं काही दिवसांपूर्वीच त्याच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. राणा आणि मिहिका यांचा साखरपुडा अत्यंत खासगी स्वरूपात पार पडला. राणानं आपल्या साखरपुड्याचे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'And it's official!'. राणा आणि मिहिकाच्या साखरपुड्याचे हे स्टनिंग फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
   
  View this post on Instagram
   

  And it’s official!! 💥💥💥💥

  A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

  राणानं शेअर केलेल्या या फोटोंच्या कमेंटमध्ये या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहेत. अनेक बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टींतील कलाकारांनी मिहिका आणि राणाचं अभिनंदन केलं आहे. याशिवाय त्याच्या चाहत्यांनीही या दोघांच्या पुढील वाचलीचस शुभेच्छा दिल्या आहेत.
  मिहिका बजाज एक इव्हेट प्लानर आहे. ती 'ड्यू ड्रॉप डिजाइन' स्टूडिओची मालकीण आहे. तिचा हा स्टूडिओ मुंबईमध्ये आहे. मिहिकाच्या अगोदर राणाचं नाव तृष्णा कृष्णन आणि अनुष्का शेट्टी या अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर राणाचा 'हाथी मेरा साथी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र त्याच्या रिलीज डेट बद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
  First published: