फर्स्ट लूक - 102 वर्षांचे बिग बी आणि 75 वर्षांचे ऋषी कपूर

फर्स्ट लूक - 102 वर्षांचे बिग बी आणि 75 वर्षांचे ऋषी कपूर

त्या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.

  • Share this:

19 मे : ' 102 नाॅट आऊट' सिनेमाची चर्चा जोरात सुरू आहे. याचं एकमेव कारण म्हणजे यातले वडील झालेले अमिताभ बच्चन 102 वर्षांचे आहेत ,तर त्यांच्या मुलाची भूमिका करणारे ऋषी कपूर 75 वर्षांचे आहेत. त्या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.

102 नाॅट आऊट सिनेमा एका गुजराती नाटकावर आधारित आहे. हे नाटक सौम्या जोशीनं लिहिलंय. उमेश शुक्ला या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय.

या सिनेमातली 102 वर्षांची वृद्ध व्यक्तिरेखा अमिताभ बच्चन साकारतायत. या व्यक्तीला जगातला सर्वात म्हातारा होण्याचं रेकाॅर्ड करायचंय. उमेश शुक्लानं ओ माय गाॅड हा हिट सिनेमा बनवलाय.

बिग बी आणि ऋषी कपूरच्या या बाप-लेकाची जोडी कशी रंगतेय, याबद्दलच उत्सुकता आहे. टी सीरिजच्या भूषणकुमारनी याची निर्मिती केलीय.

First published: May 19, 2017, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading