'ट्युबलाईट’ची पहिल्या दिवसाची कमाई फक्त २१ कोटी १५ लाख

ट्युबलाईट सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई २१.१५ कोटी झाली. सलमानच्या इतर सिनेमांच्या तुलनेत ती कमी आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2017 05:20 PM IST

'ट्युबलाईट’ची पहिल्या दिवसाची कमाई फक्त  २१ कोटी १५ लाख

 

२४ जून: सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’नं पहिल्या दिवशी कमाई केलीय फक्त २१कोटी १५ लाखाची. ईदचा वीकेण्ड मोठा असल्यानं लोकांना सुट्ट्या आहेत पण सिनेमावर समीक्षकांनी केलेली टीका महागात पडतेय असं दिसतंय. सलमानच्या पहिल्या दिवसाची कमाई इतकी कमी कधी नसते.

आतापर्यंत सलमानच्या सिनेमाचा पहिल्या दिवसाचा रेकार्ड पाहता ट्युबलाईटची कमाई कमी म्हणता येईल. सलमानच्या सुलतानची पहिल्या दिवसाची कमाई होती, ३६.५४ कोटी. तर बजरंगी भाईजानची २७.२५ कोटी,एक था टायगरनं पहिल्या दिवशी मजल मारली होती ३२.९३ कोटीची, तर किकची पहिल्या दिवसाची किक होती २६.४ कोटी.

त्यामुळे आता सोमवारी इदच्या दिवशी ट्युबलाईट किती उजळतेय ते पाहायचं. दुबईत या सिनेमानं ६ कोटींची कमाई केलीय. हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात झूझू ही चिनी अभिनेत्रीही आहे. चीनकडून ट्युबलाईला बऱ्याच अपेक्षा आहेत.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2017 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...