मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दिवाळीपूर्वीच 'मन्नत'समोर आतषबाजी, पाहा Shah Rukh Khanच्या घराबाहेरचा Latest VIDEO

दिवाळीपूर्वीच 'मन्नत'समोर आतषबाजी, पाहा Shah Rukh Khanच्या घराबाहेरचा Latest VIDEO

याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई, 28 ऑक्टोबर : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा सुपूत्र आर्यन खान याला जामीन मंजूर केला आहे. गेल्या 25 दिवसांपासून त्याच्या जामीनासाठी प्रयत्न सुरू होते. आधी NCB कोठडी त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. आता तर आर्यन खान याला कोठडीत पाठविणारे समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात येत आहे. (Fireworks in front of Mannat before Diwali, watch latest VIDEO of Shah Rukh Khans house)

त्यामुळे या ड्रग्ज प्रकरणामुळे अख्खा देश ढवळून निघाला आहे. दरम्यान आज आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर मन्नतसमोर आतषबाजी करण्यात आली. शाहरूखच्या चाहत्यांनी मन्नतसमोर फटाके फोडले. या घटनेचा एक व्हिडीओ (Latest VIDEO) समोर आला आहे.

या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर 7 जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं.  त्यांनतर या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण लागलं होतं. यामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. इतकंच नव्हे तर अभिनेत्री अनन्या पांडेच नावसुद्धा यामध्ये होतं पुढं आलं होतं. . आर्यन आणि अनन्याचे व्हॉट्सअप चॅट्स समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.

हे ही वाचा-Aryan Khanसोबत जामीन मिळालेली मुनमुन धमेचा आहे तरी कोण ?

आज मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह, मुनमुन धमेचा आणि अरबाज खान यांना जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी आजही आर्यनला तुरुंगात राहावं लागणार आहे.

या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात जळगावातील (Jalgaon) एका हॅकरने मोठा दावा केला होता. त्याच्या या दाव्यामुळे प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे. या हॅकरचं नाव मनीष भंगाळे असं असून तो जळगावातील असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने या प्रकरणाबाबत मुंबई पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे लिखित तक्रार केली आहे. यात दिल्यानुसार पुराव्यांशी छेडछाड (manipulate the evidence) करण्यासाठी हॅकरला ५ लाखांची (hacker claims to have offered 5 Lacks) ऑफर देण्यात आली होती.

First published:

Tags: Aryan khan, Mumbai, NCB, Shah Rukh Khan