'झीरो'च्या सेटवर मोठी आग, शाहरूख खान थोडक्यात बचावला

‘झीरो’च्या सेटवर अचानक आग लागल्याने सर्वांचाच गोंधळ उडाला. पण सुदैवाने या आगीत कोणालाही इजा झाली नाही. ही दुर्घटना घडताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2018 09:44 AM IST

'झीरो'च्या सेटवर मोठी आग, शाहरूख खान थोडक्यात बचावला

मुंबई, 30 नोव्हेंबर : शाहरुख खानची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘झीरो’ या चित्रपटाच्या सेटवर गुरुवारी आग लागली. ही दुर्घटना घडली तेव्हा शाहरुखही सेटवर होता. सुदैवानं किंग खानसह कुणालाही दुखापत झाली नाही.

‘झीरो’च्या सेटवर अचानक आग लागल्याने सर्वांचाच गोंधळ उडाला. पण सुदैवाने या आगीत कोणालाही इजा झाली नाही. ही दुर्घटना घडताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या फिल्मसिटीत दाखल झाल्या होत्या.

अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आलं. तसंच वेळीस सर्वांना बाहेर काढल्यानं पुढचा अनर्थ टळला.

ही आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पण शाहरुखसारखा मोठा अभिनेता काम करत असलेल्या सिनेमाच्या सेटवर असा हलगर्जीपणा कसा होतो, तसंच अशी आग लागू नये, म्हणून उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा प्रश्न आता समोर येत आहे.

दरम्यान, आनंद एल राय दिग्दर्शित आणि शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला झीरो हा सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होतोय. चित्रपटाचा पहिला टीझर पाहिला तर ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ हीच म्हण आठवते. आता बादशाह शाहरुख शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ यांनी 'पा' चित्रपटात वेगळा लूक केला होता. आता शाहरुखही 'झीरो' चित्रपटातून वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Loading...

सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे.

चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बवुआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.


VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून तरुणाची हत्या


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2018 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...