VIDEO : 'कुमकुम भाग्य'च्या सेटवर लागली आग, थोडक्यात बचावले कलाकार

VIDEO : 'कुमकुम भाग्य'च्या सेटवर लागली आग, थोडक्यात बचावले कलाकार

टेलिव्हिजन मालिका 'कुमकुम भाग्य' (Kumkum Bhagya) च्या सेटवर शनिवारी मोठा अपघात टळला आहे. शूटिंग सुरू असताना कुमकुम भाग्यच्या सेटवर आग लागल्याने गोंधळ उडाला होता.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : टेलिव्हिजन मालिका 'कुमकुम भाग्य' (Kumkum Bhagya) च्या सेटवर शनिवारी मोठा अपघात टळला आहे. शूटिंग सुरू असताना कुमकुम भाग्यच्या सेटवर आग लागल्याने गोंधळ उडाला होता. ज्यानंतर मालिकेची पूर्ण टीम बिथरली होती. 'कुमकुम भाग्य'चे शूटिंग मुंबईतील साकी नाका या परिसरात असणाऱ्या किलिक निक्सॉन स्टुडिओ (Killick Nixon Studio) मध्ये सुरू होते. यावेळी सेटवर अचानक आग लागली. दरम्यान यावेळी या कार्यक्रमातील मुख्य भूमिकेतील कलाकार सृती झा (Sriti Jha) आणि शब्बीर अहलुवालिया (Shabir Ahluwalia) यांच्यासह संपूर्ण क्रू आणि इतर कलाकार उपस्थित होते. मात्र मोठी दुर्घटना टळल्यामुळे सर्वजण थोडक्यात बचावले आहेत.

अशी माहिती मिळते आहे की, जेव्हा ही घटना घडली त्यावेळी सेटवर खूप सारे लोक उपस्थित होते. मालिकेच्या सेटवर लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सेटवर गोंधळ उडालेला पाहायला मिळतो आहे.

View this post on Instagram

A fire broke out on the sets of Kumkum Bhagya, earlier on Saturday, 18th July 2020. Thankfully, Shabir-Sriti & everyone else including all actors & crew members of the show are safe! 🙏🏻❤️ No casualties were reported. Property damage has occurred with some portion of the set being majorly affected. Shooting is expected to resume again from Sunday morning! - Thank you to all you guys for your concern about Shabir & for sending in love & blessings for his safety ❤️ #pankhabrigade - 🎥: Video footage from the sets! • #shabirahluwalia #sritijha #kumkumbhagya #rockstarfuggi #AbhiGya #कुमकुमभाग् #loncengcinta #ahkalbim #twistoffate #iniyaIrumalargal #alegedragostea #sindhooram #TiSha #rockstarabhi #abhitherockstar #TEAMSHABIR

A post shared by Team Shabir Ahluwalia (@teamshabira) on

(हे वाचा-रिया चक्रवर्तीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल,दिली होती धमकी)

सेलिब्रिटी फोटोग्राफर Viral Bhayani ने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या आगीमुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही आहे मात्र मालिकेच्या टीम मेंबर्समध्ये दहशत निर्माण झाली आहे.

सेटवर आग लागल्याचे कळताच सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुर्घटनेची सूचना मिळताच अग्निशमन दल देखील याठिकाणी वेळेत पोहोचले होते.

(हे वाचा-बॉलिवूडला आणखी एक धक्का, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे जयपूरमध्ये निधन)

दरम्यान काही दिवसांपूर्वी 'कसौटी जिंदगी की (Kasautii Zindagi Kay)मधील अभिनेता पार्थ समथान (Parth Samthan) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर किलिक निक्सॉन स्टुडिओ बंद ठेवण्यात आला होता. 3 दिवस स्टुडिओ बंद ठेवल्यानंतर स्टुडिओ सॅनिटाइझ करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा याठिकाणी काम सुरू करण्यात आले होते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 19, 2020, 12:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या