आरके स्टुडिओची आग आटोक्यात,'सुपर डान्सर'चा सेट जळून खाक

आरके स्टुडिओची आग आटोक्यात,'सुपर डान्सर'चा सेट जळून खाक

या आगीत सुपर डान्सर या शोचा सेट जळून खाक झालाय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाले नाही.

  • Share this:

16 सप्टेंबर : मुंबईतील चेंबूर येथील आरके स्टुडिओला लागलेली भीषण आग आटोक्यात आलीये. या आगीत सुपर डान्सर या शोचा सेट जळून खाक झालाय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाले नाही.

दुपारी 2.30 च्या सुमारास आरके स्टुडिओला आग लागली होती. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्यात. 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आलंय.

या आगीत स्टुडिओतील 100X80 स्केवअर फुटाची एक रूम जळून खाक झाली. या रूममध्ये इलेक्ट्रिकचं आणि शोभेचं साहित्य होतं. या आगीमुळे इलेक्ट्रिकल वायरिंगचं मोठ नुकसान झालंय.नव्याने येत असलेल्या सुपर डान्स 2 च्या सेटवरही आग लागली होती अशी माहिती मिळतेय.  सुदैवाने आज शनिवार असल्यामुळे स्टुडिओमध्ये कुणी नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली.

ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांनी 1948 साली आरके स्टुडिओची स्थापना केली होती. या स्टुडिओत 'आग' हा पहिला सिनेमा तयार करण्यात आला होता.

First published: September 16, 2017, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading