मुंबई, 4 डिसेंबर : टीव्ही अभिनेता राकेश पॉलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या सोसायटीत झालेल्या धोकादायक अपघाताचं दृश्य दाखवलं आहे. अलीकडेच या अभिनेत्याच्या इमारतीला भीषण आग लागली होती. अभिनेत्याने इमारतीला लागलेल्या आगीचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्याच्या या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ज्यामध्ये घरातून आग आणि धूर निघताना दिसत आहेत. अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
राकेश पॉलने या घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राकेशने सांगितले की, तो सकाळी 10:50 वाजता त्याच्या शूटिंगसाठी निघणार होता, पण अचानक त्याच्या इमारतीला आग लागली. आग पाहून तोही घाबरला. TOI शी बोलताना अभिनेता म्हणाला, मी शूटिंगसाठी निघणार होतो, तेव्हा मालाडमधील आमच्या 28 मजली इमारतीत फायर अलार्म वाजला. सर्व लोकांना तातडीने बाहेर काढण्यात आले, मात्र ज्या फ्लॅटमध्ये आग लागली त्या फ्लॅटमध्ये राहणारी मुलगी अडकली होती. ती तिच्या खिडकीच्या ग्रीलजवळ आली, प्रत्येकाने तिला काही सेकंद थांबायला सांगितले. पण आग लागल्याचे पाहून मुलगी घाबरली आणि तिने बाहेर उडी मारली. सध्या मुलगी रुग्णालयात दाखल आहे.
View this post on Instagram
अचानकपणे लागलेल्या या आगीमुळे सगळेच घाबरले. त्यांच्या बिल्डिंगमध्ये सुरक्षेचे सर्व उपाय होते, त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले. अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली आणि काही वेळातच अग्निशमन दलाने येऊन सर्व काही आटोक्यात आणले. प्रत्येक इमारतीत असं सुरक्षेचे उपाय असणे आवश्यक आहे. अभिनेत्याने शेअर केल्या पोस्टमध्ये अभिनेता म्हणाला, 'इमारतीमध्ये भीषण आग लागली होती. सुरक्षा आणि कर्मचारी यांचे आभार. त्याच्यामुळे अग्निशमन दल येण्यापूर्वीच गोष्टी आटोक्यात आल्या. सर्वशक्तिमान देवाचे आभार'.
दरम्यान, राकेश पॉलबद्दल बोलायचे झाले तर तो टीव्ही अभिनेता आहे. राकेश 'Ssshhhh... कोई है' मध्ये दिसला आहे. 2013 मध्ये त्याने 'जो बीवी से प्यार करे' मध्येही काम केले आहे. तो आता 'ना वय की सीमा हो' मध्ये काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.