Home /News /entertainment /

हैदराबाद बलात्कार प्रकरण; अक्षय कुमार, सलमान खानसह 38 कलाकारांवर अटकेची टांगती तलवार, गुन्हा दाखल

हैदराबाद बलात्कार प्रकरण; अक्षय कुमार, सलमान खानसह 38 कलाकारांवर अटकेची टांगती तलवार, गुन्हा दाखल

अक्षय कुमार, सलमान खानसह 38 कलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय कुमार, सलमान खानसह 38 कलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hyderabad Gang Rape Case: 2019 साली हैदराबादमध्ये एक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये 4 जणांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार (gang rape by 4 men) केला होता.

    हैदराबाद, 07 सप्टेंबर: 2019 साली हैदराबादमध्ये एक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण (Hyderabad rape case) समोर आलं होतं. ज्यामध्ये 4 जणांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार (gang rape by 4 men) केला होता. त्यानंतर नराधमांनी तिला जिवंत जाळलं (After Rape accused set victim on fire) होतं. या संतापजनक घटनेनं सर्वांना धक्का बसला होता. अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला होता. सामान्य लोकांसोबतच बॉलिवुडच्या कलाकारांनी देखील या घटनेबाबत दुःख आणि नाराजी व्यक्त केली होती. पण पीडितेबद्दल दु: ख व्यक्त करताना काही सेलिब्रिटींनी पीडित मुलीची ओळख उघड (Celebrities reveal victim's identity) केली होती. बलात्कार पीडित मुलीची ओळख उघड करणं हा कायद्यानं गुन्हा असल्यानं याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अजय देवगण (Ajay Devgan), अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan), रकुलप्रीत सिंग (Rakul Preet Singh) यांच्यासह 38 भारतीय सेलिब्रिटींवर बलात्कार पीडितेची ओळख सोशल मीडियावर उघड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा-सिद्धार्थच्या मृत्यूचा या अभिनेत्रीने घेतला धक्का; रुग्णालयात सुरुय उपचार बॉलिवूड कलाकरां व्यतिरिक्त या सेलिब्रिटींमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा देखील समावेश आहे. कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार पीडितेचं नाव, छायाचित्र किंवा खरी ओळख कुठेही उघड करणं हा गुन्हा आहे. दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिल्लीतील सबजी मंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 228A अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. हेही वाचा-KBC 13:कोणत्या नेत्यानं शिक्षिका म्हणून सुरू केली कारकीर्द? 6 लाखासाठीचा प्रश्न तसेच याप्रकरणी तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपल्या याचिकेत तक्रारदार वकिलानं म्हटलं की, सामान्यांसाठी उदाहरण बनण्याऐवजी भारतीय सेलिब्रिटी नियम मोडत आहेत. त्यांनी पीडितेची ओळख उघड केली आहे. संबंधित सर्व सेलिब्रिटींना तातडीनं अटक करण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्त्या वकीलानं केली आहे. त्यामुळे अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण सहित 38 कलाकारांवर अटकेती टांगती तलवार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood, Crime news, Gang Rape

    पुढील बातम्या