मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लग्न करणं सुगंधा मिश्राला पडलं भारी; आठवड्याभरात दाखल झाली पोलीस तक्रार

लग्न करणं सुगंधा मिश्राला पडलं भारी; आठवड्याभरात दाखल झाली पोलीस तक्रार

सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) आणि संकेत भोसले (Sanket Bhosale) यांच काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पंजाब मधील जालंधरमध्ये दोघांनीही लग्न गाठ बांधली होती. पंजाब मधील फगवाडामध्ये तिच्यावर कोरोना नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News Digital

मुंबई 6 मे  : कॉमेडीयन (Comedian) सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) आणि संकेत भोसले (Sanket Bhosale) यांच काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पंजाब मधील जालंधरमध्ये दोघांनीही लग्न गाठ बांधली होती. पण आता सुगंधा मिश्रावर पोलिस केस फाइल करण्यात आली आहे. 9 दिवसांपूर्वीच म्हणजेच 26 एप्रिल 2021 ला दोघांचं लग्न झालं होत.

‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show)  फेम कॉमेडियन सुगंधा ही एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे. या शो नंतर तिला तुफान लोकप्रियता मिळाली होती. तर तिचा दिर्घकाळ राहिलेला बॉयफ्रेंड कॉमेडियन संकेत भोसले सोबत तिने विवाह केला होता. पण गुरुवारी पंजाब मधील फगवाडा मध्ये तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना नियमांचा भंग करत विवाह सोहळा पार पाडला असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. सुगंधा ही जालंधरची रहीवासी आहे. तेथील एका रिसॉर्टवर हा विवाहसोहळा पार पडला होता.

View this post on Instagram

A post shared by (@sugandhamishra23)

कोरोना नियमांच उल्लंघन करत जास्त लोक लग्नसोहळ्याला उपस्थित असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. क्लब कबाना या रिसॉर्टवर हा सोहळा आय़ोजीत करण्यात आला होता. या रिसॉर्टवरही आता कारवाई करण्यात येणार आहे.

तारक मेहतामध्ये परतणार जुनी अंजली भाभी? पाहा काय म्हणाली सुनैना फौजदार

दरम्यान लग्नापूर्वी सुंगधाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिला तिचं लग्न फार धुमधडक्यात करायचं होतं, पण कोरोनामुळे आता ते साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. तर लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक आणि कुटुंबिय यामध्ये एक प्रायव्हेट सेरेमनी असा हा सोहळा पार पडेल. पण त्याच्या लग्नाचे काही व्हिडिओज व्हयरल झाले आहेत त्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. पंजाब मध्ये 40 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. पण लग्नात 100 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Entertainment, The kapil sharma show