सुशांत प्रकरणात फेक न्यूजचा सुळसुळाट! युट्यूबरने 4 महिन्यात कमावले 15 लाख, मुंबई पोलिसांत FIR दाखल

सुशांत प्रकरणात फेक न्यूजचा सुळसुळाट! युट्यूबरने 4 महिन्यात कमावले 15 लाख, मुंबई पोलिसांत FIR दाखल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) सोशल मीडियावर अनेकांनी त्यांची मतं मांडली आहेत. या प्रकरणांचा तपास केंद्रीय संस्थांकडे जाण्याआधी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Actor Sushant Singh Rajput Death Case) विविध अँगलने अद्याप सुरु आहे. याप्रकरणी समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये (Drug Connection) एनसीबीकडून (NCB) सखोल चौकशी सुरू आहे. याप्रकरणी बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली होती.

दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात सोशल मीडियावर विविध भाष्य करण्यात आली आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर तपास केला जावा अशी मागणी वारंवार केली आहे. तर अनेकांनी तपास प्रक्रियेबाबत मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) वर ताशेरे ओढले. मात्र अशाप्रकारे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर केलेली टीका एका युट्यूबरला (YouTuber) चांगलीच महागात पडली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधील (Bihar) एका युट्यूबर विरोधात एफआयआर (FIR) दाखल केली आहे. राशिद सिद्दीकी असं या युट्यूबरचं नाव आहे.

मिडडे च्या एका अहवालानुसार सिव्हिल इंजिनीअर असणाऱ्या या युट्यूबरने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बनावट कंटेट पब्लिश करून फक्त 4 महिन्यात 15 लाख रुपयांची भरभक्कम कमाई केली आहे. राशिद सिद्दीकी FF NEWS नावाचे युट्यूब चॅनेल चालवतो.

आदित्य ठाकरेंवरही केली होती टीका

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात फेक स्टोरी आणि व्हिडीओ पोस्ट करणे, मानहानी, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणे असे आरोप राशिद सिद्दीकीवर करण्यात आले आहेत. पोलिसांनी बदनामी, सार्वजनिक गैरवर्तन आणि हेतूपूर्वक अपमान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. त्याने या प्रकरणात विविध बनावट कथा तयार करून लाखो व्ह्यूज मिळवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  फेक सोशल मीडिया अकाउंट प्रकरणात तपास करताना राशिद सिद्दीकीचं नाव समोर आलं होते. याप्रकरणी शिवसेनेच्या लीगल सेलने देखील पोलिसांत सिद्दीकी विरोधात तक्रार दाखल केली होती. मीडिया अहवालांनुसार त्याने मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या बद्दलही आक्षेपार्ह विधानं केली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 19, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या