• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'The Kapil Sharma Show' विरुद्ध तक्रार दाखल; कोर्टाचा अपमान केल्याचा लागला आरोप

'The Kapil Sharma Show' विरुद्ध तक्रार दाखल; कोर्टाचा अपमान केल्याचा लागला आरोप

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show) आपल्या एका एपिसोडच्या दृश्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे

 • Share this:
  मुंबई, 24सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show) आपल्या एका एपिसोडच्या दृश्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कपिलच्या शोच्या एका एपिसोडमध्ये कोर्टाचं दृश्य दाखवण्यात आलं होत. मात्र यामध्ये काही कलाकार मद्यपान करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या शोवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच या शोने कोर्टाचा अपमान केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. इंडिया टुडे, च्या एका रिपोर्टनुसार, मध्यप्रदेशच्या शिवपुरी या ठिकाणी ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही एफआयआर त्या सीनसाठी आहे, ज्यामध्ये कोर्टरूममध्ये मद्यपान करताना दाखवण्यात आलं आहे. या व्यक्तीने या सीनवरून कोर्टाचा अपमान झाल्याचं सांगत या शोच्या निर्मात्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यावेळी आरोप करणाऱ्याने म्हटलं आहे, 'सोनी टीव्हीवर प्रक्षेपित होणारा ;'द कपिल शर्मा शो' की घाणेरडा आहे. यामध्ये सर्वांसमोर कलाकरांना मद्यपान करताना दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे कोर्टाचा अपमान झाला आहे. म्हणून मी या शोवर कलम ३५६/३ नुसार तक्रार दाखल केली आहे. यासारखी दृश्ये परत दाखवण्यात येऊ नयेत. या प्रकरणाची सुनावणी १ ऑक्टोबरला होणार आहे. (हे वाचा:आम्ही अजून लग्न नाही केलं...' म्हणत सलमानने केला आपल्या Longest रिलेशनशिपचा...) या व्यक्तीने ज्या एपिसोडमधील सीनवर आक्षेप घेतला आहे. तो सीन जानेवारीमध्ये प्रक्षेपित झाला होता. यामध्ये सेटवर कोर्ट रूमचं सेटअप करण्यात आलं होतं. तर काही कलाकारांनी कोर्टरूममध्ये मद्यपान केल्याचं दाखवण्यात आलं होता. या शोमध्ये कपिल शर्मा होस्टच्या भूमिकेत असतो. तर भारती सिंग, सुमोना चक्रवर्ती, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, अर्चना पुरन सिंग असे कलाकार काम करतात. हा शो प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. तसेच हा शो याआधीही विवादांमध्ये अडकला होता.
  Published by:Aiman Desai
  First published: