Home /News /entertainment /

सुपर HOT अंदाजामुळे समंथा प्रभू अडचणीत; आयटम सॉन्गविरुद्ध FIR दाखल

सुपर HOT अंदाजामुळे समंथा प्रभू अडचणीत; आयटम सॉन्गविरुद्ध FIR दाखल

साऊथ सेन्सेशन (South Actress) म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samntha Ruth Prabhu) नेहमीच आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफमुळे चर्चेत असते.

    मुंबई, 14 डिसेंबर-   साऊथ सेन्सेशन   (South Actress)  म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू   (Samntha Ruth Prabhu)  नेहमीच आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफमुळे चर्चेत असते. गेली अनेक दिवस अभिनेत्री आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. तर आता अभिनेत्री एका नव्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्या एका हॉट आयटम सॉन्गमुळे अभिनेत्रीवर तक्रार दाखल झाल्याची  (FIR)  घटना घडली आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांच्या आगामी 'पुष्पा द राईज' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील दोघांचा हटके लूक नुकताच समोर आला होता. त्यांनतर त्यांच्या लूकची बरीच चर्चा झाली होती. तसेच हा चित्रपट आणखी एका कारणासाठी चर्चेत होता आणि ते म्हणजे अभिनेत्री समंथा प्रभूचा आयटम सॉन्ग. समंथाने या चित्रपटात अतिशय बोल्ड असा आयटम डान्स केला आहे. नुकताच हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं तामिळमध्ये 'सोलरिया मामा' आणि तेलुगूमध्ये में ऊ अंतावा अशा लिरिक्समध्ये ऐकायला मिळत आहे. हे गाणं समंथाच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे. मात्र यागाण्याने अभिनेत्रीला अडचणीत आणलं आहे. हे गाणं रिलीज होताच त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पुरुषांसाठी काम करत असलेल्या एका सामाजिक संस्थेने आआक्षेप घेत ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मते या गाण्यातून असं दर्शवलं जात आहे, कि पुरुषांच्या मनात नेहमीच अश्लील विचार सुरु असतात. त्यामुळे या संस्थेने या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. (हे वाचा:OMG! मायनस 1 डिग्रीमध्ये शर्टलेस रनिंग करताना दिसला टायगर श्रॉफ; VIDEO VIRAL ) समंथा प्रभूने काही दिवसांपूर्वी पूर्व पती नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतला होता. हे जोडपं साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात रोमँटिक जोडपं म्हणून ओळखलं जात होतं. मात्र त्यांच्या अचानक घेतलेल्या इतक्या मोठ्या निर्णयाने सर्वानांच धक्का बसला होता. आता हे जोडपं आपापल्या आयुष्यात पुढे जात आहे. दोघेही आपापल्या कामात व्यग्र आहेत. घटस्फोटानंतर समंथा आपल्या उर्वरित प्रोजेक्टस शूटिंग पूर्ण करत आहे. तसेच ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्री उत्तराखंडला दर्शन घेण्यासाठी गेली होती.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South actress

    पुढील बातम्या