मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राजकुमार हिरानी यांच्या नावानं होतेय फसवणूक; तरुणांकडून लाटले लाखो रुपये

राजकुमार हिरानी यांच्या नावानं होतेय फसवणूक; तरुणांकडून लाटले लाखो रुपये

राजकुमार हिरानींचा मुलगा असल्याचे सांगून तरुणांना लाखो रुपयांना लुटले

राजकुमार हिरानींचा मुलगा असल्याचे सांगून तरुणांना लाखो रुपयांना लुटले

राजकुमार हिरानींचा मुलगा असल्याचे सांगून तरुणांना लाखो रुपयांना लुटले

मुंबई 17 जुलै: बॉलिवूडमध्ये काम करून सुपरस्टार होण्यासाठी देशभरातील हजारो तरुण कलाकार दरवर्षी मुंबईत येतात. यापैकी काही यशस्वी होतात तर काही अपयशी. परंतु या स्पर्धेच निमित्त साधून नवोदित कलाकारांना फसवण्याच्या प्रकार मात्र गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. (online fraud complaint) नुकतेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या प्रकरणी पोलीस तक्रार केली आहे. राजकुमार हिरानी यांचा मुलगा आहे असं सांगून तरुणांना फसवणाऱ्या एका व्यक्तीविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

‘मोमोमुळे कुटुंबीय माझ्यावर ओरडतात’; मिराला भूमिकेतून बाहेर पडणं जातेय अवघड

राजकुमार हिरानी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी 66(क) व 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला राजकुमार हिरानी यांचा मुलगा कबीर हिरानी असल्याची बतावणी करत अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवोदित कलाकारांना लक्ष्य केले. हा भामटा इन्स्टाग्रामवरून अशा नवोदित कलाकारांना संपर्क साधायचा आणि त्यांना राजकुमार हिरानी यांच्या आगामी चित्रपटात काम मिळवून देण्याचे आश्वासन द्यायचा.

‘अशा भूमिका नकोच, कारण…’; आई व्हायचं नव्हतं म्हणून अभिनेत्रीनं सोडली मालिका

अलिकडेच त्याने राजकुमार हिरानी 3 टीनएज नावाच्या चित्रपटाची निर्मिती करत असल्याची जाहिरात इन्स्टाग्रामवर केली होती. त्यासाठी त्यांना कलाकारांची तातडीने गरज असल्याचे देखील नमूद केलं होतं. इतकेच नाही तर ही जाहिरात खरी वाटावी यासाठी राजकुमार यांच्या कार्यालयाचा पत्ता देखील लिहिला होता. या प्रकारानंतर राजकुमार हिरानी यांनी अंधेरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या भामट्याविरोधात गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Crime, Cyber crime, Online fraud