ड्रामा क्वीन राखी सावंतविरोधात FIR; जवळच्या व्यक्तीमुळे सापडली अडचणीत

ड्रामा क्वीन राखी सावंतविरोधात FIR; जवळच्या व्यक्तीमुळे सापडली अडचणीत

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi sawant) सध्या आईच्या आजारपणामुळे चिंतेत आहे, त्यात आता तिच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मार्च : ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत (Rakhi sawant) अडचणीत सापडली आहे. राखीविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भाऊ राकेशमुळे राखी अडचणीत सापडली आहे. तिच्यासह राकेश आणि इतर काही जणांविरोधात दिल्लीतील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राखीचा भाऊ राकेशनं एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याने फिल्म बनवण्यासाठी आणि डान्सिंग इन्स्टिट्यूट खोलण्यासाठी म्हणून एका व्यक्तीकडून पैसे घेतले. शैलेश श्रीवास्तव असं या व्यक्तीचं नाव आहे. राकेशनं शैलेशकडून 6 लाख रुपये घेतले आणि राखी सावंत या डान्स इन्स्टिट्यूटचा भाग असेल असंही सांगितलं होतं.

राखी आणि राकेशविरोधात दिल्लीतील विकासपुरी पोलीस ठाण्यात 22 फेब्रुवारीला FIR दाखल करण्यात आला.  दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवण्यात आलं.

हे वाचा - तापसी पन्नू, अनुराग कश्यप इनकम टॅक्स विभागाच्या रडावर; मुंबईत विविध ठिकाणी छापा

राखी सावंत बिग बॉस 14 मध्ये होती, ज्यामध्ये ती आपल्या विचित्र वागणुकीमुळे कायमच चर्चेत राहिली. सध्या राखी आपल्या आईच्या आजारपणामुळे तणावात आहे. तिची आई जया गेली अनेक वर्षे कॅन्सरशी लढते आहे, तिच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपचारांसाठी अभिनेता सलमान आणि सोहेल खाननं तिला आर्थिक मदतही केली आहे. या मदतीसाठी राखीच्या आईनं दोघांचे आभार मानले. शिवाय सोहलने  एका व्हिडीओद्वारे राखीचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.

Published by: Priya Lad
First published: March 3, 2021, 9:46 PM IST

ताज्या बातम्या