मुंबई, 29 मे- मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अनेक पार्टी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र फिरताना दिसतात. अनेकदा दोघं डिनर डेटसाठीही जातात. यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. २०१७ मध्ये जेव्हा मलायकाने अरबाज खानशी घटस्फोट घेतला यामागचं कारण सुरुवातीला अर्जुन असल्याचं म्हटलं जात होतं. पण दोघांनी सहमताने घटस्फोट घेतल्याचं नंतर समोर आलं. घटस्फोटानंतर लगेचच मलायका आणि अर्जुनच्या नात्याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली होती.
आजोबा जाऊन 24 तासही उलटले नाहीत आणि अजय-काजोलच्या लेकीने केली सलॉन वारी, VIDEO व्हायरल
सध्या दोघं अनेक कार्यक्रमांत सहसा एकत्रच फिरताना दिसतात. दोघंही कॉफी विथ करणमध्ये गेले असता करणने अनेकदा दोघांना त्यांच्या नात्याबद्दल विचारले. पण दोघांनीही शिताफीने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. ३३ वर्षांचा अर्जुन आणि ४५ वर्षांची मलायकाच्या वयात तब्बल १२ वर्षांचं अंतर आहे. पण याचा दोघांनाही फारसा फरक पडत नाही. स्वतः अरबाजलाही ही गोष्ट फारच सामान्य वाटते. सध्या अरबाजचं परदेशी मॉडेलसोबत अफेअर असून स्वतः अरबाजने ही गोष्टी यूट्यूबच्या पिंच शोमध्ये मान्य केली आहे.
रेड बिकीनीमध्ये पुन्हा एकदा दिसला मलायकाचा HOT अंदाज, PHOTO VIRAL
अर्जुन आणि मलायकाच्या नात्यावर अगदी सुरुवातीपासूनच मोहर लावण्यात आली नव्हती. अनेकदा विचारूनही त्यांनी कित्येक महिने यावर बोलणं टाळलं होतं. एवढंच नाही तर करण जोहर, करिना कपूर, प्रियांका चोप्रा आणि जान्हवी कपूर यांनीही त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. पण तरीही कोणत्याच प्रश्नाचं मलायका आणि अर्जुनने कधीच उत्तर दिलं नाही. आता इंडियाज मोस्ट वाँटेड सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळ दोघांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला असून अधिकृतरित्या ते एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं आहे.
India's Most Wanted च्या स्क्रिनिंगला अर्जुनच्या 'या' सावत्र बहिणीबरोबर वाढलं मलायकाचं बाँडिंग
'या' कारणासाठी मलायकाशी लग्न करणं टाळतोय अर्जुन कपूर?
मीडियाचे आभार- अर्जुनने आपल्या नात्याबद्दल सांगताना मीडियाचे आभारही मानले. प्रसारमाध्यमांनी त्यांच्या नात्याला कोणत्याही वाईट पद्धतीने न दाखवता संवेदनशीलता जपली, त्यामुळेच दोघंही प्रसारमाध्यमांसमोर खुलेपणाने समोर आले. अर्जुन म्हणाला की, दोघंही कधी प्रसारमाध्यमांपासून लपले नाहीत आणि मीडियानेही प्रत्येक ठिकाणी त्यांचा पाठलाग केला नाही. प्रत्येक नात्याच्या स्वतःच्या अशा काही अडचणी असतात आणि मीडियाने आम्हाला यासाठीचा वेळ दिला.
मध्यरात्री ‘सैफिना’सोबत डिनर डेटला गेले अर्जुन- मलायका
अर्जुन पुढे म्हणाला की, आम्ही काही लपून ठेवलं नाही. आम्ही नेहमीच स्वतःहून फोटो दिले. या सगळ्यात आम्ही मीडियाला फक्त एकच विनंती केली की, फोटो छापताना आम्ही काही चूक करतोय या पद्धतीने छापू नका. अर्जुन मलायकाच्या नात्यावर सलमान खानही नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. पण याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरानेही याबद्दल कोणतंच भाष्य केलं नाही.
SPECIAL REPORT : दहावीपेक्षा बारावीचे मार्क भरपूर, पाहा आर्चीचं रिपोर्टकार्ड