मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aamir Khan Birthday: 'कयामत से कयामत तक'पासून ‘लाल सिंह चड्ढा’पर्यंत, जाणून घ्या अभिनेत्याचा प्रवास

Aamir Khan Birthday: 'कयामत से कयामत तक'पासून ‘लाल सिंह चड्ढा’पर्यंत, जाणून घ्या अभिनेत्याचा प्रवास

कयामत से कयामत तकपासून ‘लाल सिंह चड्ढा’पर्य़ंतचा प्रवास करणाऱ्या आमिरच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आजही चाहत्यांना माहिती नाहीत. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त (Aamir Khan Birthday) याच गोष्टी जाणून घेऊ.

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 14 मार्च : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' (Mr perfectionist) म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानचा आज वाढदिवस (Aamir Khan Birthday) आहे. आमिरचा जन्म 1965 मध्ये मुंबईमध्ये झाला. आमिर खान आपल्या सिनेमांबाबत कोणतीही तडजोड करत नाही. तो पुर्ण मेहनत घेऊन त्याला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. याच कारणामुळे प्रत्येकवेळी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरतो. आमिर खाननं 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज अभिनेत्यानं शेकडो सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कयामत से कयामत तकपासून ‘लाल सिंह चड्ढा’पर्य़ंतचा प्रवास करणाऱ्या आमिरच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आजही चाहत्यांना माहिती नाहीत. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त याच गोष्टी जाणून घेऊ. आमिर खानच्या आयुष्यात अनेक अशी वळणं आली ज्याबद्दल त्याच्या चाहत्यांना माहिती नाही. 1) आमिर खानचा जन्म 14 मार्च 1965 रोजी ताहिर हुसैन यांच्या घरी झाला. 2) आमिर या नावाचा अर्थ आहे, नेहमी नेतृत्व करणारा 3) आमिर खानचं पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान असं आहे. आज आमिर एक कलाकार, दिग्दर्शक, निर्माता आणि टॉक शोचा होस्ट आहे. 4) आमिर खानच्या वडिलांचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. इतकंच नाही तर त्याचे वडील ताहिर हुसैन चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होते. 5) आमिर खानचे चुलते नासिर हुसैनदेखील निर्माता आणि दिग्दर्शक होते. त्यांनी यादों की बारात आणि तिसरी मंजिलसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. 6) आमिर खानला खर्चासाठी २० रुपये मिळायचे आणि अभिनेता आपलं आवडीचं काम कॉमिक्स या पैशानं विकत घ्यायचा. 7) आमिर खानला मित्रापेक्षा मैत्रिणी अधिक होत्या. 8) आमिरला बारावीनंतर पुणे फिल्म 8 इन्स्टीट्यूटमधून ट्रेनिंग घ्यायचं होतं, मात्र वडीलांनी नकार दिल्यानं अभिनेत्याचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. 9) आमिर खानचा भाऊ फैजल खानदेखील अभिनेता आहे, त्यानं बस्ती, बॉर्डर हिंदोस्तान का, दुश्मनी, मेला आणि जो जीता वही सिकंदरसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 10) आमिर खानची बहिण निखत खानदेखील चित्रपट निर्माती आहे.
First published:

Tags: Aamir khan, Birthday celebration, Bollywood News, Star celebraties

पुढील बातम्या