• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • माझं आणि काशिनाथ घाणेकरांचं व्यक्तिमत्त्वं पूर्ण वेगळं - सुबोध भावे

माझं आणि काशिनाथ घाणेकरांचं व्यक्तिमत्त्वं पूर्ण वेगळं - सुबोध भावे

सुबोध भावेचा 'सविता दामोदर परांजपे' रिलीज होतोय. सगळीकडे सिनेमाचे प्रोमोज चाललेत. प्रसिद्ध नाटकावर हा सिनेमा बेतलाय. सुबोध भावेनं साकारलेल्या शरद अभ्यंकरकडे सुबोध कसा पाहतोय?

  • Share this:
मुंबई, 30 आॅगस्ट : सुबोध भावेचा 'सविता दामोदर परांजपे' रिलीज होतोय. सगळीकडे सिनेमाचे प्रोमोज चाललेत. प्रसिद्ध नाटकावर हा सिनेमा बेतलाय. सुबोध भावेनं साकारलेल्या शरद अभ्यंकरकडे सुबोध कसा पाहतोय? ' हा शरद मध्यमवर्गीय आहे. लेखनाची आवड आहे. त्याच्या कादंबरीला पुरस्कार मिळालाय. हा प्रॅक्टिकल आहे. देवभोळा नाही.' सुबोध आपल्या व्यक्तिरेखेबद्दल सांगत होता. ' शरद कुसुमच्या प्रेमात पडतो. लग्न करतो. पण मग त्याला हळूहळू कळतं की कादंबरीत अडचणी निर्माण करणं वेगळं आणि खऱ्या आयुष्यातल्या अडचणी वेगळ्या.' सुबोध सांगतो. सिनेमात कुसुमची भूमिका करणारी तृप्ती तोडरमलचा हा पहिलाच सिनेमा. सुबोधसारखा कसलेला कलाकार आणि नवी अभिनेत्री हा मेळ कसा साधला जातोय? सुबोध सांगतो, ' प्रत्येक कलाकृती वेगळी असते. त्यातल्या कलाकारांनी आधी किती काम केलंय, हे महत्त्वाचं नसतं. ती कलाकृती त्या कलाकारासाठी नवीन असते. उलट नव्या कलाकारांकडून बरंच काही शिकताही येतं.' सविता दामोदर परांजपे हे नाटक सुपरहिट होतं. ते बऱ्याच जणांनी पाहिलंय. मग नाटक माहीत असणारे रहस्यमय सिनेमा बघायला येऊ शकतात? यावर सुबोध बावेचं उत्तर असं आहे, 'आपण कादंबरी वाचतो. पुढे काय घडणार हे माहीत असूनही वाचतो. ती कशी उलगडलीय, हे पाहतो, त्यात रमतो. सिनेमाचंही असंच आहे.' सुबोध सांगतो, ' सिनेमा कसा मांडलाय, हे रसिकाला पाहायचं असतं. शिवाय नाटकात ज्या मर्यादा असतात, त्या सिनेमात नसतात. तो जास्त रंजक केला जातो.' सिनेमाता निर्माता जाॅन अब्राहम आहे. त्याचे आणि सुबोधचे वेगळे बंध आहेत. सिनेमासाठीही जाॅनची पहिली पसंती सुबोधच होती. सुबोध जाॅनवर खूश आहे. तो म्हणाला, ' जाॅन हा साधा सरळ अभिनेता आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यानं निर्माता म्हणून नेहमीच वेगळे सिनेमे दिलेत. तो चांगला, सज्जन आहे.' सुबोधचा काशिनाथ घाणेकर सिनेमाही रिलीजसाठी सज्ज आहे. त्यातलं सुबोधचं लूक घाणेकरांशी मिळतं जुळतं आहे. सुबोध या सिनेमाबद्दल म्हणतो, 'काशिनाथ घाणेकर साकारणं सोपं नव्हतं. माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. आमची व्यक्तिमत्त्वही वेगळी आहेत.बालगंधर्व, लोकमान्य साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होतं. पण इथे असं काहीच नव्हतं.' सुबोध म्हणतो, 'बघ ना, नुसत्या त्यांच्या नावावर नाटक हाऊसफुल होत होतं. मला असा अनुभव कधीच आलेला नाही.' अर्थात, सुबोध सगळं श्रेय दिग्दर्शक अभिजीत देशपांडेला देतो. त्यानं सिनेमा चांगला लिहिलाय. सुबोधची नवी मालिका तुला पाहते रे सध्या नंबर वन बनलीय. सुबोध म्हणतो, ' टीव्ही माझं आवडतं माध्यम आहे. ही मालिका खूपच लोकप्रिय झालीय. अगदी मराठी भाषिक नसलेलेही मला मालिका आवडते म्हणून मेसेज करतात. या मालिकेची सुरुवात आणि शेवट मला माहीत आहे. मी मालिका एंजाॅय करतोय.' निर्माता आणि कलाकार, सुबोधला कुठली भूमिका जास्त आवडते? यावर तो सांगतो, ' माध्यमाशी जोडणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मग कुठलीही भूमिका असो.' सुबोध सध्या खूपच बिझी आहे. मग तो त्याच्या फिटनेससाठी काय करतोय? 'मी मस्तीभरं आयुष्य जगत नाही. जागरणं टाळतो. चांगली झोप घेतो. चालायला जातो. बाहेरचं जेवण कमी खातो. शक्यतो सेटवर घरचा डबा नेतो.' सुबोधचा फॅन फाॅलोइंगही खूप आहे. आणि रसिकांना सुबोधच्या जास्तीत जास्त कलाकृती पाहायच्या आहेत. VIDEO : तरुणाच्या हत्येची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
First published: