रणबीर-आलियाबद्दलचं गुपित सांगून महेश भट्ट यांनी केली सगळ्यांची बोलती बंद

रणबीर-आलियाबद्दलचं गुपित सांगून महेश भट्ट यांनी केली सगळ्यांची बोलती बंद

महेश भट्टना आलिया-रणबीरबद्दल विचारलं असता त्यांनी एकदम कडक उत्तर दिलं. त्यामुळे सगळ्यांची बोलतीच बंद झाली. काय म्हणाले महेश भट्ट?

  • Share this:

मुंबई, 25 आॅगस्ट : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या रिलेशनशिपवर जोरदार चर्चा सुरू आहे. कधी कोणी त्यांना एकत्र पाहिलं असतं तर कधी रणबीर म्हणतो आमचं असं काही नाहीय. पण एका प्रेस काॅन्फरन्समध्ये महेश भट्टना आलिया-रणबीरबद्दल विचारलं असता त्यांनी एकदम कडक उत्तर दिलं. त्यामुळे सगळ्यांची बोलतीच बंद झाली. काय म्हणाले महेश भट्ट?

महेश भट्ट म्हणाले, ' आलिया आणि रणबीर आता मोठे आहेत. मी मुलांच्या खाजगी आयुष्यात दखल घेत नाही. कारण ते त्यांचे निर्णय घ्यायला सक्षम आहेत.'

ते पुढे म्हणाले, ' आलिया मोठी झालीय. ती तिच्या खाजगी गोष्टी सगळ्यांना सांगत नाही. उलट पूजा तिची प्रत्येक गोष्ट शेअर करते. '

दरम्यान,रणबीर म्हणाला, ' आलिया आणि माझ्या अफेअरची जी चर्चा आहे, त्यात काही तथ्य नाही. तो एक शो बिझनेस आहे. लोक आज एक कहाणी रचतात, उद्या दुसरी.'

रणबीरनं लग्न कधी करायचं यावरही गंभीरपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, ' जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडता, एकमेकांबरोबर आयुष्य घालवावं असं वाटतं तेव्हा लग्न करायचं. माझ्या आयुष्यात तरी अजून कुणी नाहीय. मी 35 वर्षांचा झालो, म्हणून आता लग्न करायला हवं, असं अजिबातच नाहीय. ते सहज व्हायला हवं.'

आपल्या आणि आलियाविषयी बोलताना रणबीरने हा खुलासाही केला की, आम्ही दोघेही प्राणीप्रेमी आहेत. बऱ्याचदा या दोघांना आपापल्या पाळीव प्राण्यांसोबत फोटो शेयर करताना पाहिलं गेलं आहे.

रणबीरचा संजू सिनेमा सुपरडुपर हिट झाला. तो आणि आलिया ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र असणार आहेत. सोबत बिग बीही आहेत.

VIDEO : 'डब्बू अंकल' इज बॅक, मिथुनच्या गाण्यावर तुफान डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2018 06:03 PM IST

ताज्या बातम्या