दिग्दर्शक सुजॉय घोषने Twitter वर लीक केली कहानी 3 ची स्टोरी; विद्या बागची आता काय शोधणार पाहा

दिग्दर्शक सुजॉय घोषने Twitter वर लीक केली कहानी 3 ची स्टोरी; विद्या बागची आता काय शोधणार पाहा

विद्या बालन अभिनित kahaani कहानी हा चित्रपट तुमच्या चांगला लक्षात असेल. कहानी 2 हा सीक्वेलसुद्धा येऊन गेला आहे. आता दिग्दर्शक सुजॉय घोषने कहानी 3 संदर्भात Twitter वर काय लिहिलंय पाहा..

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : विद्या बालन अभिनित kahaani कहानी हा चित्रपट तुमच्या चांगला लक्षात असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला होता आणि समीक्षकांनीही गौरवला होता. आपल्या बेपत्ता असलेल्या नवऱ्याला शोधणाऱ्या विद्या बागची नावाच्या गरोदर महिलेची - भूमिका विद्या बालनने साकारली होती.

कहानी चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक सुजॉय घोषने कहानी 2 हा सीक्वेलसुद्धा आणला. सस्पेन्स थ्रिलर प्रकारचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. आता कहानीचा तिसरा भाग प्रदर्शित होतोय की काय... सुजॉय घोषने एक गमतीदार ट्वीट केलं आणि त्यात कहानी 3 ची कहाणीसुद्धा सांगितली.

kahaani3 will be bidya bagchi finding vodaphone network. it might run into kahaani4 also... असं त्याने ट्वीट केलं आहे.

'कहानी 3 मध्ये विद्या बागची व्होडाफोनच्या नेटवर्कचा शोध घेताना दिसेल.... कदाचित यासाठी कहानी 4 असा आणखी एक भागसुद्धा निघेल...' अशा अर्थाचं उपहासपूर्ण Tweet सुजॉय घोषनं केलं आहे.

सुजॉयने मोबाईल नेटवर्कला कंटाळून असं उपहासात्मक ट्वीट करत सगळ्यांचीच फिरकी घेतली. त्याला नेटिझन्सनीसुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलं.

या उपहास आणि अतिशयोक्तीपूर्ण ट्वीटची दखल घेत अनेकांनी त्यावर कोट्या केल्या आणि या सिनेमाला ऑस्करसुद्धा मिळेल, असेही तारे तोडले.

व्होडाफोन आयडियासंदर्भात गेले काही दिवस येणाऱ्या बातम्यांचाही संदर्भ काही यूजर्सनी लावला आणि त्यावर मल्लिनाथी केली.

अन्य बातम्या

शरद पवार आणि PM मोदी यांच्या भेटीवर सोनिया गांधी नाराज!

VIDEO : बिबट्या आणि अजगराच्या लढाईत अखेर जिंकलं कोण?

शिवसेनेला आणखी एक धक्का, निर्णयावर 17 आमदार नाराज?

फक्त शर्ट घालून बाहेर पडली मलायका अरोरा, युजर्सनी विचारलं...

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: November 20, 2019, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading