Home /News /entertainment /

सलमानच्या हिरोईनला कोरोनाचा धोका, टेस्ट करायलाही नाहीत पैसे; भाईजानकडे मागितली मदत

सलमानच्या हिरोईनला कोरोनाचा धोका, टेस्ट करायलाही नाहीत पैसे; भाईजानकडे मागितली मदत

अभिनेत्री पूजा डडवालची तब्येत मागच्या काही दिवसांपासून बिघडली आहे. तिला मागच्या एका आठवड्यापासून सर्दी-खोकला आणि श्वसनाचा त्रास होत आहे.

    मुंबई, 14 जून : सलमान खानचा सिनेमा वीरगतीमधील अभिनेत्री पूजा डडवालची तब्येत मागच्या काही दिवसांपासून बिघडली आहे. तिला मागच्या एका आठवड्यापासून सर्दी-खोकला आणि श्वसनाचा त्रास होत आहे. याशिवाय घशात खवखव, ताप आणि अशक्तपणा सुद्धा आहे. मागच्या काही दिवसांपासून तिची तब्येत अधिकच बिघडत आहे. ही सर्व लक्षण कोरोना व्हायरसची असल्यानं चिंतेची बाब आहे. पूजा सध्या तिच्या गोव्यतल्या घरी आहे. तिचा पती आजारी असल्यानं तिला त्याची सेवाही करावी लागत आहे. याशिवाय घरातील सर्व काम एकटीलाच करावी लागत आहेत. अशात तिची तब्येत दिवसेंदिवस ढासळत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पुजानं सांगितलं की, तिच्याकडे सध्या घरातलं सामान आणण्याएवढेही पैसे नाहीत. तिने अनेक मित्र-मैत्रिणींकडून पैसे उधार घेतल्यानं आता त्यांच्याकडून मदत मिळणंही बंद झालं आहे. विवाहित असूनही प्रेमात पडली अभिनेत्री, पहिल्या पतीशी घटस्फोट घेत केलं दुसरं लग्न पूजाला तिच्या तब्येतीबद्दल प्रश्न विचारले असता ती म्हणाली, मागच्या काही दिवसांपासून माझी तब्येत खूप बिघडत चालली आहे. सर्वात आधी मला खोकला सुरू झाला. त्यानंतर ताप यायला लागला. मागच्या काही दिवसांपासून गोव्यातलं वातावरण थंड आहे. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे माझी तब्येत बिघडली आहे. मला खोकला झालाय याचा अर्थ असा नाही की मला कोरोना आहे. मी एवढ्यात मरणार नाही. कोरोना टेस्टसाठी नाहीत पैसे जवळच्या डॉक्टरांना दाखवण्याचा आणि कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिल्यावर पूजा म्हणाली, मला जी लक्षण आहेत ती सामान्यतः कोरोना पॉझिटीव्ह लोकांमध्ये दिसून आली आहेत. मलाही भीती वाटते मात्र माझ्याकडे कोरोना टेस्ट करण्याएवढे पैसे नाहीत. कोणाकडून उधार पैसे घेऊन मी उपाचर घेऊ शकत नाही. वातावरणातील बदलाचा परिणाम आहे मी काही दिवसांतच ठिक होईन. सलमानकडे मागितली मदत पूजा या मुलाखतीत म्हणाली, मी याआधीही सलमानकडे मदत मागितली आहे. त्यांनी मदत सुद्धा केली. मुंबईमध्ये 6-8 महिने माझ्यावर उपचार केले आणि त्यानंतर गोव्यात माझ्या राहण्याची व्यवस्था केली. आज मी पुन्हा एकदा सलमानकडे मदत मागत आहे. खरं तर त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा मदत मागणं मलाही ठिक नाही वाटत पण त्यांच्याशिवाय माझी कोणीच मदत करणार नाही हे माहित आहे. आज पुन्हा एका माडियाच्या माध्यमातून सांगते, सलमान मी संकटात आहे कृपया माझी मदत करा. अरेच्चा! हात न टेकवता PUSH UPS; कतरिनाने हे केलं तरी कसं? पाहा व्हिडीओ
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Salman khan

    पुढील बातम्या