'संजू' सिनेमासाठी संजय दत्तनं घेतले 'इतके' कोटी!

'संजू' सिनेमासाठी संजय दत्तनं घेतले 'इतके' कोटी!

आपलं आयुष्य पडद्यावर दाखवायला संजूबाबानं काही फक्त मैत्रीखातर परवानगी दिली नाही.

  • Share this:

मुंबई, ०९ जुलै : 'संजू' सिनेमा बाॅक्स आॅफिसवर सुपरडुपर हिट झाला. ९ दिवसात सिनेमानं २३४ कोटी मिळवले. संजय दत्तनं भूमिका केलेल्या सिनेमांनीही इतकी मजल मारली नव्हती. या सिनेमावर उलटसुलट बरीच चर्चा झाली. गुन्हेगारावर सिनेमा करावा का इथपासून राजकुमार हिरानीची संजय दत्तबरोबरची मैत्री इथपर्यंत बरीच चर्चा झडली. पण आपलं आयुष्य पडद्यावर दाखवायला संजूबाबानं काही फक्त मैत्रीखातर परवानगी दिली नाही. त्यासाठी त्यानं घेतले ९ ते १० कोटी. शिवाय नफ्यातला हिस्साही त्यानं मागितलाय.

रणबीर कपूरच्या आयुष्यातला संजू हा सर्वात हिट सिनेमा ठरलाय. पहिल्या सात दिवसांतच 'संजू'नं अामिर खानचा '3इडिअट्स' आणि 'दंगल'चे रेकॉर्ड तोडले आहेत. या आठवड्यात दुसरा कुठलाही नवीन हिंदी सिनेमा रिलीज न होण्याचाही फायदा संजू सिनेमाला झाला. 200 करोड क्लबच्या यादीत समाविष्ट होणारा रणबीर कपूरचाही हा पहिलाच सिनेमा आहे.

हेही वाचा

photos : संगीता बिजलानी आणि सलमानच्या लग्नाची आमंत्रण पत्रिकाही तयार होती पण...

एकेकाळी पेपर टाकणारी सनी 'या' अटीवर झाली पाॅर्नस्टार

शर्मिष्ठा वाचली,नंदकिशोर बिग बॉस घरातून बाहेर !

पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने एकूण २०२. ५१ कोटी रूपये कमावले. यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी १२.५० कोटी, दुस-या शनिवारी २१.२५ कोटींचा गल्ला जमवला.

 

First published: July 9, 2018, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading