Home /News /entertainment /

बॉलिवूडला आणखी एक धक्का! ज्येष्ठ निर्मात्याचे मुंबईत निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का! ज्येष्ठ निर्मात्याचे मुंबईत निधन

मनोरंजन विश्वाला धक्का देणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ निर्माते हरीश शाह (Harish Shah) यांचे आज निधन झाले.

    मुंबई, 07 जुलै : मनोरंजन विश्वाला धक्का देणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ निर्माते हरीश शाह (Harish Shah) यांचे आज निधन झाले. राजेश खन्ना आणि तनुजा यांचा 1972 मधील सिनेमा 'मेरे जीवन साथी'चे निर्माता हरीश शाह यांनी आज मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी सकाळी 6 वाजता त्यांचे निधन झाले. मीडिया अहवालांनुसार गेल्या 10 वर्षांपासून ते कॅन्सरशी लढा देत होते. indianexpress.com शी बोलताना त्यांचे बंधू विनोद शाह यांनी अशी माहिती दिली की, 'हरीश घशाच्या कॅन्सरशी गेल्या 10 वर्षांपासून लढा देत होता. आज 1 वाजण्याच्या सुमारात त्याचे अंत्यसंस्कार पवन हन्स याठिकाणी पार पडतील. कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे ठराविक माणसांनाच अंत्यसंस्कारासाठी येता येणार आहे.' (हे वाचा-सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात नवीन माहिती उघड, घरामध्ये कुठेही नव्हता CCTV) हरीश शाह 'दिल और मोहब्बत', 'मेरे जीवन साथी', 'काला सोना', 'धन दौलत' 'राम तेरे कितने नाम', 'होटल', 'जाल - द ट्रॅप'  यांसारख्या तब्बल 9 चित्रपटांचे निर्माते होते. सन्नी देओल स्टारर 2003 मध्ये त्यांनी बनवलेला ''जाल - द ट्रॅप' चित्रपट शाह यांचा शेवटचा सिनेमा होता. त्यांनी त्यांच्या चित्रपट व्यावसायाच्या कारकिर्दीमध्ये राजेश खन्ना, तनूजा, फिरोज खान, मुमताज, धर्मेंद्र, ऋषी कपूर, नीतू सिंग, शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल यांसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केले होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. (हे वाचा-सुशांत आत्महत्या प्रकरणात एकाच दिवशी दोनदा झाली भन्साळींची चौकशी, तपास जैसे थे!) संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या