रामदास स्वामींच्या आयुष्यावर येतोय 'रघुवीर'

रामदास स्वामींच्या आयुष्यावर येतोय 'रघुवीर'

स्वामींची भूमिका कोण करतंय हे अजून गुलदस्त्यात आहे.

  • Share this:

10 मे : ‘शुभ मंगल सावधान’ हा मंत्र उच्चारताच त्या १२ वर्षाच्या मुलाने भर लग्नातून धूम ठोकली. रानोमाळ भटकला.  वैराग्य धारण केले आणि त्याला जीवनाचे सार सापडले.  हेच जीवनाचे सार आपल्याला ‘दासबोध’ या ग्रंथातून आदर्श जीवन जगण्याचे धडे देतो.  हा तरुण म्हणजे महाराष्ट्रातील संत सांप्रदायातील एक संत समर्थ रामदास स्वामी. आणि त्यांच्यावरच सिनेमा येतोय रघुवीर. पण स्वामींची भूमिका कोण करतंय हे अजून गुलदस्त्यात आहे.

पहिल्यांदाच अशा या तेजस्वी आणि ओजस्वी संताची आजच्या पिढीला नव्याने ओळख कन देण्यासाठी ‘रघुवीर’ हा सिनेमा लवकरच पडद्यावर येत आहे.  अभिराम भडकमकर यांनी चित्रपटाची कथा पटकथा लिहिली आहे.  मंदार चोळकर यांची गीते आणि अजित परब यांच्या संगीताने चित्रपट नटलाय.  निर्माते अभिनव पाठक यांची समर्थ क्रियेशन ही संस्था या चित्रपटाची निर्मिती करत असून निलेश कुंजीर हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

First published: May 10, 2018, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading