नितीन गडकरी यांच्यावर येतोय सिनेमा, 'या' गोष्टींवर आहे प्रकाशझोत

नितीन गडकरी यांच्यावर येतोय सिनेमा, 'या' गोष्टींवर आहे प्रकाशझोत

दिग्दर्शक अनुराग भुसारी यांच्या म्हणण्याप्रमाणे सिनेमात गडकरी यांच्या जीवनाला योग्य प्रकारे दाखवलं गेलंय.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : सध्या राजकारण आणि नेत्यांवर सिनेमे बनतायत. नुकतेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी, शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सिनेमे बनले. आता आणखी एका नेत्यावर सिनेमा बनतोय.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आता सिनेमा बनतोय. काही लोकांचं म्हणणं आहे की हा सिनेमा प्रचारासाठी बनला जातोय. पण दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी हे म्हणणं अमान्य केलं. हा सिनेमा खऱ्या घटनांवर असल्याचा दावा दिग्दर्शकानं केला.

दिग्दर्शक अनुराग भुसारी यांच्या म्हणण्याप्रमाणे सिनेमात गडकरी यांच्या जीवनाला योग्य प्रकारे दाखवलं गेलंय. ते म्हणाले, 'नुकतेच राजकारण्यांवर सिनेमे रिलीज झाले. लोकांनी म्हटलं ते प्रचारासाठी बनले. पण हा सिनेमा वास्तवावर आहे.'

अनुराग म्हणाला, ' मी सिनेमात गडकरी किती चांगले आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांचा संघर्षच सिनेमात दाखवलाय. त्या संदर्भातल्या घटना दाखवल्यात. त्यांचं आयुष्य, राजकीय प्रवास आणि त्यांचा केंद्रीय मंत्री बनण्याचा प्रवास दाखवलाय.'

अनुरागनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रोजेक्टवर काम करणं सुरू केलं होतं. सहा महिन्यांच्या रिसर्चनंतर त्यानं दोन महिन्यात सिनेमा पूर्ण केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा सिनेमा क्राऊड फंडिंगनं बनला आहे. ते म्हणाले, गडकरींसारख्या नेत्याच्या नावावर कुणीही निर्माता तयार झाला असता, पण मग पटकथेवर दबाव येऊ शकला असता. म्हणून पैसे गोळा करून सिनेमा बनवला.

या सिनेमासंदर्भात त्यांचं गडकरींच्या पत्नीशी बोलणं झालंय. ते नितीन गडकरींच्या लहानपणीच्या मित्रालाही भेटले. 'गडकरी' या सिनेमात राहुल चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा 5 मार्चच्या आधी युट्युबवर दाखवला जाईल.

बाॅलिवूडच्या महानायकानं इंडस्ट्रीत पूर्ण केली 50 वर्ष, अभिषेक-श्वेतानं लिहिली इमोशनल पोस्ट

First published: February 16, 2019, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading