News18 Lokmat

मोठ्या पडद्यावर पाहता येणार 'एअर स्ट्राईक'; लवकरच चित्रपट येणार भेटीला

भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकवर आता चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईक मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 4, 2019 09:14 AM IST

मोठ्या पडद्यावर पाहता येणार 'एअर स्ट्राईक'; लवकरच चित्रपट येणार भेटीला

मुंबई, 4 मार्च : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून 'एअर स्ट्राईक' केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. आता भारतीय हवाई दलानं केलेल्या कामगिरीवर लवकरच चित्रपट येणार आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत हा चित्रपट तुमच्या भेटीला येईल. संजय लीला भन्साळी, भूषण कुमार, महावीर जैन आणि अभिषेक कपूर या चौघांनी एकत्र येत 'एअर स्ट्राईक'वर चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचा 'एअर स्ट्राईक' आता तुम्हाला 'बिग स्क्रिन'वर पाहायाला मिळणार आहे.

भारतीय हवाई दलानं केलेल्या कामगिरीला 'सॅल्युट' करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. शिवाय, चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळणाऱ्या फायद्यापैकी सर्वाधिक रक्कम ही सैन्य दलाच्या वेलफेअर फंडाला दान केली जाणार आहे. 'एअर स्ट्राईकवर चित्रपटाची निर्मिती करून आम्ही देशाच्या तिन्ही दलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त' करत असल्याची भावना चित्रपट निर्मात्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, 'एअर स्ट्राईक'वर चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.


UNSCमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'बाबत पाकिस्तान घेणार 'ही' भूमिका


Loading...

'उरी'ला मिळाला होता प्रचंड प्रतिसाद

पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर भारतानं 'सर्जिकल स्ट्राईक' करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय जवानांनी केलेल्या कामगिरीवर आलेला 'उरी' देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता. प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. शिवाय, कमाईमध्ये देखील 'उरी'नं 'बाहुबली'चा रेकॉर्ड मोडला होता.

त्यामुळे आता 'एअर स्ट्राईक'ला कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहावं लागणार आहे.


'एअर स्ट्राईक'

14 फेब्रुवारी रोजी पुलावामा येथे दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोट घडवून आणला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. दरम्यान, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून 26 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवला. यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.


Air Strike मध्ये मसूद अझहरचा मृत्यू? पाहा निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांचं विश्लेषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 08:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...