मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

महागुरूंची अशी ही रोमँटिक आशिकी!

महागुरूंची अशी ही रोमँटिक आशिकी!

या सिनेमाबद्दल बोलताना सुनील म्हणाला, ' ही एक रोमँटिक गोष्ट आहे. फ्रेश, एनर्जिटिक सिनेमा आहे. '

या सिनेमाबद्दल बोलताना सुनील म्हणाला, ' ही एक रोमँटिक गोष्ट आहे. फ्रेश, एनर्जिटिक सिनेमा आहे. '

या सिनेमाबद्दल बोलताना सुनील म्हणाला, ' ही एक रोमँटिक गोष्ट आहे. फ्रेश, एनर्जिटिक सिनेमा आहे. '

मुंबई, 14 आॅक्टोबर : मराठीतला एव्हरग्रीन अभिनेता सुनील बर्वेनं फेसबुकवर एक पोस्ट टाकलीय. सुनीलच्या नव्या सिनेमाबद्दलची ती पोस्ट आहे. ती इतकी इंटरेस्टिंग आहे की सुनील बर्वेला याबद्दल विचारायचा मोह आवरेना. म्हणून आम्ही सुनीलला गाठलं.

'अशी ही आशिकी' असं रोमँटिक नाव असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय महागुरू सचिन पिळगांवकर यांनी. सुनील सांगतो, ' या सिनेमात मी वडिलांची भूमिका केलीय. मी बाप बनलोय.' सुनील पुढे म्हणाला, ' सचिन पिळगांवकरांसोबत मी आत्मविश्वास हा सिनेमा केला होता. तो 1989ला. त्यानंतर आता म्हणजे जवळजवळ 29 वर्षांनी सचिनसोबत सिनेमा करतोय.

हेही वाचा

'तुंबाड' या हाॅरर सिनेमात राधिकाचा मेकओव्हर

लक्ष्मी सदैव मंगलम् सांगतेय नवरात्रीतल्या नऊ रंगांचं महत्त्व

बिग बींवर टीका करणाऱ्या सपनाचं धोनीसोबतचं कनेक्शन तुम्हाला माहीत आहे का?

या सिनेमाबद्दल बोलताना सुनील म्हणाला, ' ही एक रोमँटिक गोष्ट आहे. फ्रेश, एनर्जिटिक सिनेमा आहे. ' सुनील म्हणाला, सचिनजींचं म्हणणं होतं व्हॅलेंटाइन डे का साजरा करायचा वगैरे खूप काही घडलं. मग आता त्याला आहा डे म्हणून साजरं करा. म्हणून सिनेमाची कॅचलाईन 'आहा डे' अशी आहे.

अशी ही आशिकी ही प्रेमकथा आहे. पण हे प्रेम फक्त प्रेमिकांचं नाही. तर ते बाप-मुलगा, आई-मुलगी यांचंही आहे, सुनील सांगतो. ही प्रेमकथा पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं त्याच दिवशी हा सिनेमा रिलीज होतोय.

सुनीलसोबत या सिनेमात अभिनय बेर्डेनं त्याच्या मुलाची भूमिका केलीय. याआधी 'ती सध्या काय करतेय' सिनेमातल्या त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.

या सिनेमाशिवाय सुनील बर्वेचा वाडा सिनेमाही रिलीजसाठी सज्ज आहे. वाडाचं दिग्दर्शन महेश मांजरेकरांचं आहे. तो एक रहस्यपट आहे.

पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेला ही आशिकी कशी रंगतेय, ते पाहायचं.

First published:

Tags: Ashi hi ashiqui, Sachin pilgaonkar, Sunil barve, अशी ही आशिकी, सुनील बर्वे