निर्माता अनुराग कश्यपच्या मुलीला सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी

अनुरागनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करत त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याविषयीची माहीती दिली.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 12:30 PM IST

निर्माता अनुराग कश्यपच्या मुलीला सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी

मुंबई, 24 मे : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना मिळालेल्या यशानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. पण काही असे लोकही आहेत जे बॉलिवूड कलाकारांना खुलेआम धमक्या देऊन चर्चेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. निर्माता अनुराग कश्यपच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. एका व्यक्तीनं ट्विटरवरून अनुरागच्या मुलीला रेपची धमकी दिली असून अनुरागनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करत याविषयीची माहीती त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली.

अनुरागनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'प्रिय मोदीजी लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी तुमचं अभिनंदन. पण कृपया मला सांगा अशा फॉलोअर्सचं काय करू जे माझ्या मुलीला अशा प्रकारची धमकी देऊन विजयाचा आनंद साजरा करत आहेत.' या ट्वीटसोबत अनुरागनं एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात त्याच्या मुलीच्या फोटोवर कमेंट करताना एका व्यक्तीनं अपशब्द वापरले आहेत.अनुरागच्या या ट्वीटवर अनेकांनी त्याला सायबर सेलमध्ये तक्रार करण्याविषयी सुचवलं आहे. तर काहींनी याला अनुरागचा पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, अशा प्रकारच्या कमेंट अनेकदा फेक अकाउंटवरून येतात.

Loading...

अनुराग कश्यपची मुलगी आलियानं नुकतंच तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. पण यासोबतच ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. अनुराग बद्दल बोलायचं तर दिग्दर्शक म्हणून त्यानं 'मनमर्जियां' हा सिनेमा केला होता. याशिवाय तो ऋतिक रोशनच्या 'सुपर 30' तसेच तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर यांच्या 'सांड की आंख' या सिनेमांची निर्मिती करत आहे.

View this post on Instagram

Sundays make me feel warm inside 🌞

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...