मुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान

हा पुरस्कार स्मिता पाटील यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या आणि ४० वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तसंच ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१८’ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वेला देण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 06:54 PM IST

मुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान

मुंबई, 11 डिसेंबर : अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्तानं दुसरा स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार जाहीर झाला.  हा पुरस्कार स्मिता पाटील यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या आणि ४० वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तसंच ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१८’ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वेला देण्यात येणार आहे.

शनिवारी १५ डिसेंबरला रात्री ८:३० वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.

या कार्यक्रमात स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ या दोन चित्रपटातील गाणी सादर होतील . याला संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे यांचं असणार आहे. ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.

स्मिता पाटील या प्रतिभावंत कलाकारावर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. तिच्या चित्रपटांना आणि अविस्मरणीय अभिनयाला रसिकांनी मनापासून दाद दिली. तिला पद्मश्रीसहीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. स्मिताच्या ३१व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने २०१७ सालापासून तसंच पुढील प्रत्येक वर्षी स्मिता पाटील पुरस्कार देण्याचं जाहीर केलं होतं. पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१७’ हा  अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१७’ अभिनेत्री अमृता सुभाषला देण्यात आला होता.

आपल्या सशक्त अभियनानं प्रत्येक भूमिका जिवंत करणाऱ्या स्मिता पाटीलचं चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान आहे. स्मिताचं निधन 13 डिसेंबर 1986 रोजी झालं.

Loading...


अवधूत गुप्ते-स्पृहा जोशी दुबईला करणार 'जल्लोष'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...