S M L

हृतिक आणि कंगना येणार आमनेसामने !

हृतिक रोशन आणि कंगना रणावत यांच्यातील सुरू असलेल्या वादांबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल.

Sonali Deshpande | Updated On: Jul 26, 2018 02:48 PM IST

हृतिक आणि कंगना येणार आमनेसामने !

मुंबई, २५ जुलै :  हृतिक रोशन आणि कंगना रणावत यांच्यातील सुरू असलेल्या वादांबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. पण त्यांच्यातील हा वाद थांबण्याचं नावच घेत नाहीय. त्यांचा वाद इतका वाढला आहे की तो चक्क न्यायालयापर्यंत पोचला आहे. एकेकाळी या दोघांनी कुठलाही विचार न करता नॅशनल मीडियासमोर आरोप-प्रत्यारोप केले होते. आता हा वाद पुन्हा समोर येऊ शकतो. यावेळी या दोघांचे चित्रपट याचं कारण बनू शकतात. कंगना आणि हृतिकचा चित्रपट हा एकाच दिवशी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

कंगनाचा मणिकर्णिका हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होत आहेत. त्याच दिवशी हृतिकचा सुपर ३० ही प्रदर्शित होत आहे.  टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार मणिकर्णिकाचे निर्माते म्हणतात की, त्यांना मुद्दाम हृतिकच्या सुपर ३० या चित्रपटासोबत त्यांचा चित्रपट प्रदर्शित करायचा नाहीय. चित्रपटाच्या पटकथेनुसार हा चित्रपट स्वातंत्र्य दिन  किंवा प्रजासत्ताक दिनी  प्रदर्शित होऊ शकतो. आधीच आम्ही १५ ऑगस्ट ही तारीख गमावली आहे. आणि आता २६ जानेवारीला या चित्रपटाची तारीख निश्चित होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघांचेही चित्रपट एकाच दिवशी म्हणजेच २६ जानेवारीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होत आहे.  हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने  बॉक्स ऑफिसवर नक्कीच टक्कर आहे.

कंगनाचा मणिकर्णिका हा झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत आहे. आणि हृतिकचा सुपर ३० हा बिहारचे गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 08:32 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close