मल्याळम सिनेमा 'जल्लीकट्टू' असणार भारताची ऑस्करसाठी अधिकृत एंट्री! या मराठी आणि हिंदी चित्रपटांना टाकलं मागे

मल्याळम सिनेमा 'जल्लीकट्टू' असणार भारताची ऑस्करसाठी अधिकृत एंट्री! या मराठी आणि हिंदी चित्रपटांना टाकलं मागे

पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यासाठी भारताची अधिकृत एंट्री असण्याचा मान 'जल्लीकट्टू' (Jallikattu) या मल्याळम सिनेमाला मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर: पुढील वर्षी लॉस एंजलिसमध्ये होणाऱ्या 93व्या अॅकडमी (93rd Academy Awards) अवॉर्ड्ससाठी भारताकडून मल्याळम सिनेमा 'जल्लीकट्टू' (Jallikattu) ही अधिकृत एंट्री निश्चित करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यीय समितीने दिग्दर्शक लिओ जोस पेल्लीसरी यांचा सिनेमा 'जल्लीकट्टू'ची निवड झाली आहे. ऑस्करमध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये 'जल्लीकट्टू'ची निवड झाली आहे.

एकूण 27 सिनेमांमध्ये होती स्पर्धा

लिओ जोस पेल्लीसरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, थॉमस पेनिकर जल्लीकट्टूचे निर्माते आहेत. ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री पाठवण्यासाठी एकूण 27 चित्रपटांमध्ये स्पर्धा होती. यामध्ये शूजित सरकार यांचा 'गुलाबो सिताबो', सफदर रहना यांचा 'चिप्पा', हंसल मेहताचा 'छलांग', मराठमोळ्या चैतन्य ताम्हाणेचा 'द डिसिपल', विधु विनोद चोप्रा यांचा 'शिकारा', अनंत महादेवन यांचा 'बिटरस्वीट', रोहेना गगेराचा 'इज लव इनफ सर', गीतू मोहनदास दिग्दर्शित 'मूथॉन', नीला माधब पांडा दिग्दर्शित 'कलिरा अतिता', अन्विता दत्तचा 'बुलबुल', हार्दिक मेहता दिग्दर्शित 'कामयाब' आणि सत्यांशू-देवांशू यांचा 'चिंटू का बर्थडे', तसंच शकुंतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, भोंसले या धमाकेदार सिनेमांबरोबर 'जल्लीकट्टू'ची स्पर्धा होती.

(हे वाचा-सना खानच नाही या कलाकारांनी स्विकारला अध्यात्माचा रस्ता, नावं वाचून थक्क व्हाल)

हा सिनेमा केरळ-तामिळनाडू राज्यात भरवल्या जाणाऱ्या वादग्रस्त स्पर्धा 'जल्लीकट्टू'वर आधारित आहे. हा सिनेमा एक थ्रीलर ड्रामा आहे. भारतातच नव्हे या सिनेमाने परदेशातही या कौतुकाची थाप मिळवली आहे. 63व्या बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमदध्ये 78 देशांतून निवडण्यात आलेल्या 229 सिनेमांपैकी 'जल्लीकट्टू' एक होता. यामध्ये अँटोनी व्हर्गिस (Antony Varghese),चेंबन विनोद जोस (Chemban Vinod Jose) आणि सबुमोन अब्दूसामद (Sabumon Abdusamad) यांचा दमदार अभिनय आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 25, 2020, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading