ठरलं!! 'बधाई हो'च्या दुसऱ्या भागाची घोषणा; आयुष्यमानच्या जागी 'हा' अभिनेता झळकणार

ठरलं!! 'बधाई हो'च्या दुसऱ्या भागाची घोषणा; आयुष्यमानच्या जागी 'हा' अभिनेता झळकणार

बधाई हो (Badhaai Ho) या सिनेमाला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'बधाई दो' (Badhaai Do) या सिनेमाही प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करेल असं निर्मात्यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana)च्या 'बधाई हो' या फिल्मला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. अशातच बधाई हो च्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या सिक्वेलचं नाव 'बधाई दो' असं असणार आहे. या सिनेमामध्ये राजकुमार राव (Rajkumar Rao)सोबत भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) लीड रोलमध्ये दिसणार आहे. जंगली पिक्चर्ससोबत राजकुमार रावचा हा दुसरा सिनेमा आहे.

राजकुमार आणि भूमि पेडणेकरच्या अतरंगी भूमिका

राजकुमार राव आणि भूमि पेडणेकर 'बधाई दो'मध्ये झळकणार आहेत.

'बधाई दो' या फिल्मच्या निमित्ताने राजकुमार राव आणि भूमि पेडणेकर एकत्र काम करणार आहेत. राजकुमार राव या सिनेमामध्ये पोलिसाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. गंमत म्हणजे तो ज्या पोलीस स्टेशनमध्ये काम करत आहे तिथे सगळ्या बायका काम करत आहे. या आधी राजकुमार राव 'तलाश' सिनेमामध्ये पोलिसच्या भूमिकेमध्ये दिसला होता. भूमि पेडणेकर अत्यंत वेगळ्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. भूमि या फिल्ममध्ये पीटी टिचरच्या भूमिकेत दिसणार आहे.

'बधाई हो' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला होता. आता त्याच्या सिक्वेलमध्ये राजकुमार राव झळकणार आहे. त्याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली, "बधाई दो या सिनेमामध्ये काम करायला मिळणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच आहे ही फिल्म माझ्यासाठी खूप खास आहे" पुढे तो असंही म्हणाला, "प्रेक्षकांसाठी या सिनेमामध्ये एक सर्रप्राईझही आहे पण ते वेळ आल्यावरच आम्ही सांगू, सिनेमाच्या पहिल्या भागात प्रेक्षकांचं खूप मनोरंजन झालं दुसऱ्या भागातही आमचा तोच प्रयत्न असेल"

'बधाई हो'च्या सिक्वेलमध्ये भूमि पेडणेकरही झळकणार आहे. त्याबाबत बोलताना ती म्हणाली, "या आधी वेगवेगळ्या सिनेमांमध्ये मी अनेक भूमिका केल्या आहेत पण बधाई हो या सिनेमातली माझी भूमिका अतिशय वेगळी आहे. मला सिनेमाची कथा अत्यंत आवडली त्यातच, मी राजकुमार रावसोबत काम करणार आहे याचा मला आनंद आहे. आम्ही लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत."

Published by: Amruta Abhyankar
First published: October 18, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading