S M L

'3 इडियट्स' पाहा मेक्सिकन भाषेत

मेक्सिकोमध्ये या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय, तसंच सिनेमाही लवकरच रिलीज होईल. या रिमेकचं नाव आहे '3 idiotas'.

Sonali Deshpande | Updated On: May 11, 2017 02:05 PM IST

'3 इडियट्स' पाहा मेक्सिकन भाषेत

11 मे : तब्बल ८ वर्षांनंतर '3 इडियट्स' या सिनेमाचा रिमेक करण्यात आलाय. परंतु हा रिमेक कुठल्याही भारतीय भाषेत केला गेलेला नाहीय तर हा रिमेक केलाय तो मेक्सिकन भाषेत. मेक्सिकोमध्ये या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय, तसंच सिनेमाही लवकरच रिलीज होईल. या रिमेकचं नाव आहे '3 idiotas'.

२००९ साली आलेल्या '3 इडियट्स' या सिनेमाने सर्वांचीच मनं जिंकली होती. वास्तवावर प्रखर भाष्य करणारं कथानक, आमिरसोबत इतर कलाकारांचा अफलातून अभिनय आणि राजकुमार हिरानी यांची दिग्दर्शनातील कमाल या सगळ्याच गोष्टींमुळे हा सिनेमा बॉलिवूडमध्ये एक मैलाचा दगड ठरला होता. बॉलिवूडच्या नेहमीच्या फॉर्मुल्याला छेद देत या सिनेमात वेगळ्याच पध्दतीने विषयाची मांडणी करण्यात आलेली. खासकरून तरूण वर्गाला त्यातील विविध पात्र रिलेट झाली होती. हा सिनेमा चेतन भगत यांच्या ' 5 पॉइंट समवन ' या कादंबरीवर आधारित होता.

या सिनेमाच्या मेक्सिकन रिमेकच्या ट्रेलरमध्ये मूळ सिनेमात असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी पुन्हा पहायला मिळतायत. हा सिनेमा कार्लोस बोराडो यांनी दिग्दर्शित केलाय, तर मुख्य भूमिकेत असणारेय अल्फान्जो दोसाल, ख्रिश्चन वाज्क्वेज आणि जर्मन वाल्देज.

सिनेमा जरी मेक्सिकन भाषेत असला तरीही, सिनेमाला भाषेचं बंधन नसतं. तसाही इंग्लिश सबटायटलचा पर्याय तुमच्यासमोर आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 02:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close