आपल्या मुलाला वृद्धाश्रमात पाठवणारे पहिले वडील असतील बिग बी

आपल्या मुलाला वृद्धाश्रमात पाठवणारे पहिले वडील असतील बिग बी

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या ' 102 नाॅट आऊट' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय.

  • Share this:

09 फेब्रुवारी : अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या ' 102 नाॅट आऊट' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. वडील आणि मुलगा यांचं नातं या सिनेमातून समोर येतं. सिनेमात बिग बी 102 वर्षांचे आहेत. तर ऋषी कपूर त्यांचा मुलगा बनलेत.

सिनेमातल्या या व्यक्तिरेखेला जगातला सर्वात वृद्ध व्यक्ती व्हायचा रेकाॅर्ड करायचाय. सिनेमात अमिताभ बच्चन यांचं वेगळंच रूप समोर येतं. त्यांचा गेटअपही निराळा आहे.

ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलंय. कभी कभी, अमर अकबर अँथनी, अजुबा यांत त्यांची केमिस्ट्री चांगलीच होती. तर आताही 102 नाॅटआऊटमधून दोघांची जुगलबंदी चांगलीच रंगताना दिसतेय.

First published: February 9, 2018, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading