S M L

63 वे जिओ फिल्मफेअर पुरस्कार जाहीर; इरफान खान सर्वोत्कृष्ट अभिनेता तर विद्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 21, 2018 10:59 AM IST

63 वे जिओ फिल्मफेअर पुरस्कार जाहीर; इरफान खान सर्वोत्कृष्ट अभिनेता तर विद्या  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

21 जानेवारी:   बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार विजेते खालील प्रमाणे -

- सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मीडिअम


- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु

- सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार

Loading...

- सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)

-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)

- सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन)

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)

- सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान)

- सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन)

- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा - सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)

- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना - बद्रीनाथ की दुल्हनिया)

- सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा - सिनेमा जग्गा जासूस)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2018 10:52 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close