मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'फायटर' ठरणार भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट; अवकाशात रंगणार चित्तथरारक सीन्स

'फायटर' ठरणार भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट; अवकाशात रंगणार चित्तथरारक सीन्स

अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा ‘फायटर’ (Fighter) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा ‘फायटर’ (Fighter) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा ‘फायटर’ (Fighter) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई 9 जुलै : अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा ‘फायटर’ (Fighter) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच चित्रपटाची घोषणा झाली असून चित्रपटाचं संपूर्ण कामकाज अजून बाकी आहे. पण चित्रपटाविषयी विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे हा देशातील पहिला वहिला एरियल ऍक्शन चित्रपट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षांचीही उत्कंठा वाढली आहे.

Viacom 18 या चित्रपटाची निर्मिती करत असून गुरुवारी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. हा एक बिग बजेट चित्रपट असून प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

सोज्वळ अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही आहे संस्कारी; अभिनेत्यानेच जुळवलं होतं दिव्यांकाचं अरेंज मॅरेज

हृतिक, सिद्धार्थ आनंद यांच्या वॉर, बँग बँग सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.  तर हा देखील एक आगळा वेगळा ऍक्शन चित्रपट असणार आहे. याआधी असा प्रयोग भारतीय चित्रपटांत झाला नसल्याची त्यांनीं सांगीतल आहे.

वायकॉम 18 स्टूडियो या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ आनंद आणि त्यांची पत्नी ममता, रेमन चिब्ब आणि अंकू पांडे यांच्यासोबत मिळून करणार आहे. स्टूडियोचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अजित अंधारे यांनी सांगितलं की, “एरियल ऍक्शन चित्रपट एक वेगळचं प्रदर्शन असणार आहे. आजवर असा प्रयोग झाला नाही. Hollywood चित्रपट 'टॉप गन' चा प्रशंसक असल्याने मी मागील काही वर्षांपासून अशा चित्रपटाच्या शोधात होतो, ज्याचं मूळ भारतीय असेल ज्यावर एरियल ऍक्शन चित्रपट बनवता येईल. हाच ‘फायटर’ चित्रपट असेल.”

चित्रपटाचं शुटिंग आणि सादरीकरण हे उच्च तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी वापरून केलं जाणार आहे. चित्रपटाचं शूटिंग अनेक देशांमध्ये केलं जाणार आहे. पण कथा ही भारतीयच असणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Hritik Roshan