रणबीरमुळे आलिया आणि कतरिनाच्या मैत्रीत दुरावा?

रणबीरमुळे आलिया आणि कतरिनाच्या मैत्रीत दुरावा?

आलिया भट्ट आणि कतरिना कैफमधील मैत्री अनेकदा उघडपणे पहायला मिळते. नुकतीच या दोघींनी नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. पण आता...

  • Share this:

01 एप्रिल : आलिया भट्ट आणि कतरिना कैफमधील मैत्री अनेकदा उघडपणे पहायला मिळते. नुकतीच या दोघींनी नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. पण आता आलिया आणि कतरिनाच्या मैत्रीत फूट पडल्याचं समजतंय. एवढंच नव्हे तर कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरमुळे दोघींच्या मैत्रीत दुरावा आल्याचीही चर्चा आहे.

रणबीर-आलियाच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधली जवळीक फारच वाढल्याची चर्चा आहे. आणि हीच गोष्ट कॅटला खटकतेय. आलियाची रणबीरशी वाढती जवळीक पाहून आता दोघींच्या मैत्रीत कटूता निर्माण होते की काय असे तर्क बॉलिवूडमध्ये रंगायला लागलेत.

रणबीर आणि आलिया आगामी 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात एकत्र झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघंही सध्या त्याच शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच आलिया शूटिंग संपवून भारतात परतली आहे. पण रणबीर अजूनही लंडनमध्येच आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि आलियामध्ये जवळीक वाढल्याची चर्चा असून कतरिनाला हीच गोष्ट खटकत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2018 12:02 PM IST

ताज्या बातम्या