Elec-widget

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टींमध्ये हाणामारी VIDEO व्हायरल

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टींमध्ये हाणामारी VIDEO व्हायरल

पण या व्हिडीओमागचं सत्य मात्र काही वेगळचं आहे.या तथाकथित व्हिडीओ अक्षयनेच ट्विट केला असून सोशल मीडियावर तो व्हायरल होतोय.

  • Share this:

मुंबई 11 नोव्हेंबर : बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) सध्या सूर्यवंशी (Suryavanshi) चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अनेक वर्षानंतर अक्षयसोबत कॅटरिना कैफही पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टरही नुकतच लाँच झाल्याने सोशल मीडियावरही त्यावर चर्चा केली जातेय. सूर्यवंशीची अशी चर्चा होत असतानाच अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यात हाणामारी होत असल्याचं दिसतंय त्यामुळे नेमकं काय झालं अशी चर्चा आता सुरू झालीय. पण या व्हिडीओमागचं सत्य मात्र काही वेगळचं आहे.या तथाकथित व्हिडीओ अक्षयनेच ट्विट केला असून सोशल मीडियावर तो व्हायरल होतोय.

बोल्ड नोरा फतेहीचं Sexy फोटो सेशन; चाहते म्हणाले Hotty...!

अक्षय आणि रोहितचं भांडण सोडविण्यासाठी मग अनेक लोक येतात आणि त्यांचं भांडण सोडवतात त्या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय. या VIDEOच्या सुरवातीलाच कॅटरिना एका इंग्रजी वेबसाइटची बातमी दाखवितेय. त्यात अक्षय आणि रोहितच्या हाणामारीचं वृत्त दिलेलं असतं आणि तुम्हीही हा VIDEO पाहा असं त्यात सांगण्यात आलंय.

पण खरं सत्य हे आहे की अक्षय कुमारनेच हा विनोदी VIDEO बनवलं असून रोहित आणि अक्षयमधलं हे भांडण लुटूपुटूचं आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा VIDEO तयार करण्यात आल्याचं स्पष्ट होतंय. प्रेक्षक मात्र कुतूहलापोटी या VIDEOवर रोजदार कमेंट करत आहेत.

हे वर्ष अक्षय कुमारसाठी अतिशय चांगलं वर्ष ठरलं आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. मिशन मंगल ने तर बॉक्स बॉफिसवर 202 कोटींचा गल्ला जमवला. अक्षयच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 09:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...