मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Fawad Khan: आमिर खानसारखी बॉडी बनवणं फवाद खानच्या अंगलट; किडनीवर झाला परिणाम

Fawad Khan: आमिर खानसारखी बॉडी बनवणं फवाद खानच्या अंगलट; किडनीवर झाला परिणाम

बॉलिवूडमध्ये नेहमीच विदेशातील कलाकारांनाही चमकण्याची संधी देण्यात आली आहे.बाहेरील देशातील अनेक कलाकारांनी भारतात येऊन नाव कमावलं आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे फवाद खान होय.

बॉलिवूडमध्ये नेहमीच विदेशातील कलाकारांनाही चमकण्याची संधी देण्यात आली आहे.बाहेरील देशातील अनेक कलाकारांनी भारतात येऊन नाव कमावलं आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे फवाद खान होय.

बॉलिवूडमध्ये नेहमीच विदेशातील कलाकारांनाही चमकण्याची संधी देण्यात आली आहे.बाहेरील देशातील अनेक कलाकारांनी भारतात येऊन नाव कमावलं आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे फवाद खान होय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 24 सप्टेंबर-   बॉलिवूडमध्ये नेहमीच विदेशातील कलाकारांनाही चमकण्याची संधी देण्यात आली आहे.बाहेरील देशातील अनेक कलाकारांनी भारतात येऊन नाव कमावलं आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे फवाद खान होय. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फवाद खानला केवळ पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही चित्रपट आणि टीव्ही शोजमधून पसंत केलं जातं. सध्या फवाद त्याचा आगामी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

फवाद खानचा हा चित्रपट येत्या ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान फवाद खानच्या एका खुलाश्याने चाहत्यांना धक्का दिला आहे. फवादने आपल्या आगामी चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन बेल यांच्याप्रमाणे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न त्याला चांगलाच अंगलट आला आहे. या प्रयत्नामुळे त्याला चक्क रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. या खुलाश्यामुळे फवाद सध्या चर्चेत आला आहे.

फवाद खानला त्याच्या आगामी 'द लीजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटातील भूमिकेत फिट होण्यासाठी अनेक किलो वजन वाढवावं लागलं होतं. सुमारे 75 किलो वजनाच्या फवादने आपलं वजन 100 किलोपर्यंत वाढवलं आहे. या पाकिस्तानी अभिनेत्याला वजन वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. ही मेहनत इतकी अंगलट आली की, अभिनेत्याची किडनी निकामी झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने स्वतः सांगितलं की, त्याने आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन बेल यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता फवादलाया ट्रान्सफॉर्मेशनचा पश्चाताप होत आहे. एका मुलाखतीत फवादने सांगितले की, 'मी स्वतःशी चांगलं वागलो नाही. मी पुन्हा असं कधीच करणार नाही. मी माझ्या शरीरावर इतका दबाव टाकला की त्याचा नकारात्मक परिणाम झाला.

(हे वाचा:Shilpa Shetty: व्हॅनिटी व्हॅननंतर शिल्पा शेट्टीची नवी मर्सिडीज चर्चेत; किंमत वाचून बसेल धक्का )

मला मधुमेहही आहे आणि तो बरा होण्यासाठी 3 महिने लागले. फवादने पुढं सांगितलं की, त्याने अनेक तास शरीरावर काम केलं. आपल्याकडे वेळेची कमतरता असल्याचं त्याने म्हटलं आहे. फक्त दीड महिन्यात त्याने ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने सांगितलं, मी क्रिश्चियन बेल किंवा आमिर खान नाही, पण मला त्यांच्यासारखं परिवर्तन हवं होतं. मी परत कोणालाही अशा परिवर्तनाची शिफारस करणार नाही'.

First published:

Tags: Actor, Bollywood, Entertainment, Fitness, Pakistan