• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 86 किलो वजन 58 वर आणलं; परिणिती चोप्राने वजन कमी करण्यासाठी हा प्लान केला फॉलो

86 किलो वजन 58 वर आणलं; परिणिती चोप्राने वजन कमी करण्यासाठी हा प्लान केला फॉलो

कसं केलं परिणीतीने वजन कमी?

 • Share this:
  मुंबई, 23 ऑक्टोबर : प्रियंका चोप्राची चुलत बहीण म्हणून बॉलिवूडमध्ये आलेल्या परिणिती चोप्राने (Parineeti Chopra) अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लेडीज व्हर्सेस रिक्की बहल या चित्रपटातून पदार्पण केलेल्या परिणितीने आपल्या मेहनतीच्या जोरावर पुढे कित्येक सिनेमे मिळवले. परिणितीने बॉलिवूडमध्ये आल्यानंतर स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली होती. चित्रपटांमध्ये एकदम फिट दिसणाऱ्या परिणितीचं वजन (Parineeti Chopra weight loss) पूर्वी तब्बल 86 किलो होतं हे कोणाला सांगूनही पटणार नाही; पण हे अगदी खरं आहे. नुकताच परिणितीने आपला 33वा वाढदिवस (Parineeti Chopra Birthday) साजरा केला. या निमित्ताने तिच्या फॅट टू फिट जर्नीवर (Parineeti weight loss journey) एक नजर टाकू या. 'एशियानेट न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये परिणितीचं डाएट आणि वर्कआउट प्लॅन याबाबत माहिती देण्यात आली आहे. परिणितीने आपलं वजन कमी करण्यासाठी एकच डाएट प्लॅन (Parineeti Diet Plan) वापरला नाही. त्याऐवजी तिने वेगवेगळ्या पद्धती एकत्र वापरून आपलं वाढलेलं वजन आटोक्यात आणलं. एका मुलाखतीमध्ये तिने स्वतःच याबाबत माहिती दिली आहे. परिणिती आपलं वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी जॉगिंगला (Parineeti weight loss tips) जात होती. यानंतर ती काही वेळ ध्यानाला बसत असे. याव्यतिरिक्त स्विमिंग किंवा घोडेस्वारी यांचाही समावेश तिने आपल्या दिनचर्येत (Parineeti Gym routine) केला होता. एवढंच नाही, तर ट्रेडमिलवर धावणं, डान्स प्रॅक्टिस आणि दररोज एक तास कलारिपयट्टू या केरळमधल्या प्रसिद्ध मार्शल आर्टची प्रॅक्टिसही ती करत असे. या सगळ्यासोबतच जिममधल्या इतर मशीन्सवर व्यायाम आणि योगाची मदतही तिने घेतली. हे ही वाचा-अंकिता लोखंडेची बहीण आहे तिच्यापेक्षाही बोल्ड; ग्लॅमरस फोटोशूटने वेधलं होतं.... परिणितीने एका मुलाखतीत सांगितलं, की वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी एवढं वजन वाढलेलं पाहून तिला चिंता वाटत होती. यासोबतच आवडीचे कपडे न वापरता येणं हीदेखील एक समस्या होती; मात्र नियमित सर्व व्यायामप्रकार आणि डाएट फॉलो करून तिने तब्बल 28 किलो वजन घटवलं. आता परिणितीचं वजन केवळ 58 किलो आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एके काळी तिची कंबर (Parineeti Chopra Figure) 38 इंच होती, जी आता केवळ 30 इंच झाली आहे. परिणितीला पिझ्झा खूप आवडायचा; मात्र या वेट लॉस जर्नीमध्ये तिने पिझ्झासोबत फास्ट फूडलाही बाय-बाय केलं. सध्या ती नाश्त्याला एक ग्लास दूध, ब्राउन ब्रेड, दोन एग व्हाइट आणि कधी कधी ज्यूस एवढंच घेते. दुपारच्या जेवणामध्ये डाळ-रोटी, ब्राउन राइस, ग्रीन सॅलड आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असतो. रात्री कमी तेलात बनवलेलं साधं जेवण ती घेते. यासोबत कधी कधी एक ग्लास दूध किंवा चॉकलेट शेक याचाही समावेश असतो. ती झोपण्याच्या दोन तास आधी जेवते. कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास परिणिती आता 'उंचाई' नावाच्या एका सिनेमामध्ये झळकणार आहे. यासोबतच, रिभू दासगुप्ता यांच्या एका एका चित्रपटातही ती असेल.
  First published: