बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा सिंगिंग VIDEO VIRAL, ओळखा पाहू कोण आहे 'ती'

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा सिंगिंग VIDEO VIRAL, ओळखा पाहू कोण आहे 'ती'

या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी गोड आवाजात गाणं गाताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 08 सप्टेंबर : अभिनेत्री शिबानी दांडेकर मागच्या काही काळापासून फरहान अख्तरसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे हे दोघंही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण सध्या शिबानी एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. सध्या शिबानीनं शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे सगळीकडे शिबानीच्या नावाची चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असेलेला हा थ्रोबॅक व्हिडीओ शिबानीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी गोड आवाजात गाणं गाताना दिसत आहे.  ही लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर शिबानी स्वतः आहे. तिनं 'जाने कहा मेरा जिगर गया जी' आणि 'सत्ते पे सत्ता' ही गाणी गायली आहेत. शिबानी ही खूप उत्कृष्ट गायिका आहे. वडीलांनी ती लहान असताना घेतलेल्या पहिल्या-वहिल्या कमेऱ्यातून अगदी सहज म्हणून शूट केलेला हा व्हिडीओ असल्याचं शिबानीनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. शिबानीच्या या व्हिडीओ फरहाननं खूपच गोड अशी कमेंट केली आहे.

'राणी मीट आपली जिजाऊ...' वीणा-शिवच्या नात्याला नवं वळण

शिबानी मागच्या काही काळापासून अभिनेता फरहान अख्तरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. फराहान आणि शिबानी नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. तसेच सोशल मीडियावरही ते दोघं नेहमीच एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. त्यांचं सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरणं त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांना मात्र मान्य नाही. सूत्रांच्या माहितीनुसार फरहान आणि शिबानीच्या 'खुल्लम खुल्ला प्यार'वर त्यांचे कुटुंबीय नाराज आहेत. फरहान अख्तर लवकरच प्रियांका चोप्रा सोबत 'द स्काय इज पिंक' या सिनेमातून भेटीला येणार आहे. . पहिली पत्नी अधुनाशी काडीमोड झाल्यावर फरहान शिबानीसोबत रिलेशिपमध्ये आहे.

कतरिनाबाबत विधान केल्यानं हृतिक चर्चेत; म्हणाला, ती फक्त दिसायला हॉट आणि सुंदर..

 

View this post on Instagram

 

At, by and on your side. @shibanidandekar ❤️ #poolheads #kohsamui #FarOutdoors

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

एका मुलाखतीत शिबानी दांडेकरला फरहानशी असललेल्या नात्याबाबत विचारलं असता ती म्हणाली, मी कोणती गोष्ट सिक्रेट ठेवणाऱ्यांपैकी नाही. पण मला कोणत्याच गोष्टीचा गाजावाजा करायची गरज नाही. काही दिवसांपूर्वी फरहाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वीमिंग पूलमधला एक फोटो शेअर केला होता. ज्यात शिवानी रेड कलरच्या बिकीनीमध्ये दिसली. फरहान आणि शिबानी लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात असलं तरीही अद्याप शिबानी किंवा फरहानकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली अभिनेत्री, नंतर घडलं असं काही की...

==========================================================

कोल्हापूर महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

First published: September 8, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading