जेव्हा फरहानच्या एक्स वाइफच्या समोर आली फरहान अख्तरची मराठमोळी गर्लफ्रेंड

जेव्हा फरहानच्या एक्स वाइफच्या समोर आली फरहान अख्तरची मराठमोळी गर्लफ्रेंड

लोक आमच्याबद्दल काहीना काही बोलतच राहणार. मात्र कोणाच्या बोलण्याचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. मला माहितीये की मी काय आहे.

  • Share this:

मुंबई, १० मार्च २०१९- फरहान अख्तर सध्या शिबानी दांडेकरला डेट करत आहे. दोघं त्यांच्यातली केमिस्ट्री सोशल मीडियावर फोटोंमार्फत शेअर करत असतात. फरहानने १६ वर्षांचं लग्न मोडत २०१६ मध्ये अधुना भभानीला घटस्फोट दिला. यानंतरच फरहानचं नाव शिबानीशी जोडलं गेलं. दोघांनी गेल्यावर्षी आपल्या नात्याला अधिकृत मान्यता दिली. नुकतेच एका कार्यक्रमात शिबानी आणि अधुना यांचा आमना- सामना झाला. इथे दोघांनी एकमेकांना इग्नोर करणंच पसंत केलं.
 

View this post on Instagram
 

#shibanidandekar and #adhunabhabani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अधुना आणि शिबानी एका फुटबॉल टूर्नामेंटच्यावेळी समोरा समोर आल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी दोघींनी एकमेकांकडे लक्ष न देणंच योग्य समजलं. मात्र अशावेळी दोघींना एकमेकींच्या असण्याने फारसा फरक पडलेलाही दिसला नाही.
 

View this post on Instagram
 

#shibanidandekar and #adhunabhabani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी अर्थात २०२० मध्ये फरहान आणि शिबानी लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरू आहे. या नात्याबद्दल शिबानीला विचारले असता शिबानी म्हणाली की, ‘मी कोणत्याही गोष्टीत गुप्तता पाळावी अशी मी मुलगी नाही. पण मला कोणतीही गोष्ट ढोल बडवून पिटवायचीही गरज नाही. आम्ही पब्लिक फिगर आहोत. लोक आमच्याबद्दल काहीना काही बोलतच राहणार. मात्र कोणाच्या बोलण्याचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. मला माहितीये की मी काय आहे आणि मी ज्यालाही डेट करते त्याच्यासोबत मला फार सुरक्षित वाटतं.’बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 06:36 PM IST

ताज्या बातम्या