अभिनेता फरहान होतोय सोशल मीडियावर ट्रोल, युजर म्हणाले- 'ओ अफिम वाले चाचा'
नुकत्याच केलेल्या एका चुकीच्या ट्वीटमुळे फरहान सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार बनला आहे. फरहाननं केलेलं हे ट्वीट लोकसभा निवडणुकांच्या मतदानासंदर्भात आहे.
मुंबई, 19 मे : अभिनेता फरहान अख्तर आजकाल त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरमुळे खूप चर्चेत आहे. पण सध्या त्याची सोशल मीडियावर चर्चा होतेय ती एका वेगळ्याच कारणाने. नुकत्याच केलेल्या एका चुकीच्या ट्वीटमुळे फरहान सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार बनला आहे. फरहाननं केलेलं हे ट्वीट लोकसभा निवडणुकांच्या मतदानासंदर्भात आहे.
फरहाननं आज भोपाळमधील मतदारांना मतदानाचं आवाहन करणारं ट्वीट केलं. त्यानं लिहिलं, 'प्रिय भोपाळमधील मतदार, हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या शहराला आणखी एका गॅस दुर्घटनेपासून वाचवू शकता.' तसं पाहायला गेलं तर फरहानच्या या ट्वीटमध्ये काही चूक नाही पण भोपाळमध्ये 6 व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून 12 मे ला हे मतदान पार पडलं. आज 7 व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदाना होणार आहे. त्यामुळे चुकीच्या वेळी चुकीचं ट्वीट केल्यानं युजर्सनी फरहानला ट्रोल करत त्याला त्याचं सामान्य ज्ञान वाढवण्याचा सल्ला दिला आहे.
एका युजरनं लिहिलं- 'अजून झोपला आहेस का? एक आठवडा उलटून गेला आहे भोपाळमध्ये मतदान होऊन. तुझे वडील जेव्हा कन्हियांचा प्रचार करायला गेले होते तेव्हा तू होतास कुठे. हॅन्गओव्हर झाला असेल तर थोडं लिंबू पानी पी.'
अभी तक कही पी के पड़े थे क्या ? एक सप्ताह बीत चुका है वहां चुनाव हुए । वैसे पप्पा जी जब कन्हिया का प्रचार करने गए थे तब कहा थे आप ?
दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, जर तुला माहित नाही की भोपाळमध्ये मतदान कधी झालं. तर यावरुनच समजतं तुझ्यासाठी हा मुद्दा किती महत्वाचा आहे. असं अपील करताना नेमका तु किती गंभीर आहेस हे समजतं.
कोई जावेद साहब के इस बावले बेटे को बताओ कि भोपाल में छठे चरण मतलब 12 मई को ही चुनाव हो गया...बताइए, ये चमन सब इस देश की जनता को राजनीति पर लेक्चर देते हैं...?
मोदी विरोध में ये सब दिवालिया हो चुके है #Sorry Farhan you are late by 7 days...!! 😂😂😂
— Chowkidaar Gabbar Singh ( रामगढ़ वाले ) (@IntolerantMano2) May 19, 2019
तर एका युजरनं चक्क फरहानला 'अफिम वाले चाचा'असं म्हटलं आहे. तसेच अन्य एका युजरनं लिहिलं, डोकं तर नीट काम करतंय का?
Oo chacha... Oo afeem wale chacha.... Bhopal me ho gaye election, aap rest kar lijiye!!
देशात बहुचर्चित भोपाळ मतदार संघातून काँग्रेसनं दिग्विजय सिंह आणि भाजपनं साध्वी प्रज्ञा ठाकुर यांना उमेदवारी दिली आहे. भोपाळमध्ये 6 व्या टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून 12 मे ला हे मतदान पार पडलं.