फराह खानने दिली एड शीरनला घरीच पार्टी

फराह खानने दिली एड शीरनला घरीच पार्टी

फराह खानने एड शीरनसाठी तिच्या राहत्या घरी मोठी पार्टी काल रात्री आयोजित केली होती. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या दिग्गजांनी उपस्थिती लावली.

  • Share this:

19 नोव्हेंबर:   जस्टिन बिबरनंतर आता आणखी एका हॉलिवूड सिताऱ्याचं लाईव्ह कॉन्सर्ट मुंबईत होणार आहे. ब्रिटीश गायक एड शीरन कालच मुंबईत आला. या जगप्रसिद्ध गायकाला चित्रपट निर्माती  फराह  खानने आपल्या घरी पार्टी दिली आहे.

शीरनच्या  करिअरची सुरूवात 2004मध्ये केली होती. आज तो ज्या शिखरावर आहे त्याचं सर्व श्रेय त्याच्या परिश्रमाला आणि त्याच्या जिद्दीला जातं. फराह खानने एड शीरनसाठी तिच्या राहत्या घरी मोठी पार्टी काल रात्री आयोजित केली होती. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी  उपस्थिती लावली.

काही दिवसांपूर्वी फराह खानने ठरवलं होतं की ती शीरनला सबरबन या पंच तारांकित हॉटेलमध्ये पार्टी द्यावी.  पण नंतर तिने हा प्लॅन चेंज केला आणि आपल्या राहत्या घरी पार्टी आयोजित करण्याचं ठरवलं.याच प्रसिद्ध गायकाचं भारतात  दीपिका पादुकोण, करण जोहर, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन, कतरिना कॅफ, सुशांत सिंह राजपूत आणि मलाइका अरोरा खान स्वागत केलं आहे. हे सगळे कलाकार फराह खानच्या पार्टीमध्येही सहभागी झाले होते.

शीरनने मुंबईत येण्याआधी एका इव्हेंट ऑर्गेनाइजरला विनंती केली होती की मला राहण्यासाठी भित्तीचित्रांनी सजवलेली रुम पाहिजे. रुममध्ये मध, फळे आणि काही खास पेय हवे आहेत.

काही दिवसांपूर्वीच शीरनच्या 'शेप ऑफ यू' या गाण्याने जगभरात सगळ्यांनाच वेड लावलं होतं. आता हाच आवाज आपल्या मुंबईतही घुमणार आहे. पोलीस सुरक्षा व्यवस्थेत आपल्या तरुणाईला आवडणारा गायक एड शीरन मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट करण्यासाठी आला आहे.

या कॉन्सर्टनंतर एड शीरन मुकेश आणि नीता अंबानी यांच्या घरी पाहूणा म्हणून जाणार आहे. मुकेश अंबानी आणि निता अंबानी त्याच्यासाठी ग्रँड पार्टी आयोजित करणार आहे.

First published: November 19, 2017, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading